ETV Bharat / sports

RR vs KKR : कोलकाताचा राजस्थानवर ३७ धावांनी विजय - कोलकाता स्कॉड टुडे

आयपीएलच्या १२व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थानला ३७ धावांनी धूळ चारली. कोलकाताकडून २० धावात २ बळी घेणारा शिवम मावी सामन्याचा मानकरी ठरला.

ipl 2020 dc vs srh match live
RR vs KKR LIVE
author img

By

Published : Sep 30, 2020, 7:09 PM IST

Updated : Sep 30, 2020, 11:49 PM IST

दुबई - आयपीएल २०२०मध्ये आज कोलकाता नाइट रायडर्सचा सामना सुसाट फॉर्मात असलेल्या राजस्थान रॉयल्सशी झाला. या सामन्यात कोलकाताने ३७ धावांनी विजय मिळवला आहे. कोलकाताच्या १७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ २० षटकांत १३७ धावाच करू शकला. कोलकाताच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना निष्प्रभ केले. कोलकाताचा शिवम मावी हा आजच्या सामन्याचा मानकरी ठरला.

कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांना अपयश आले. सलामीवीर जोस बटलर २१ धावांवर तंबूत परतला. त्याला शिवम मावी याने बाद केले. राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ (३) या सामन्यात अपयशी ठरला. मागच्या दोन सामन्यांमध्ये स्फोटक फलंदाजी करणाऱ्या सॅमसनला मावीने ८ धावांवर बाद केले. त्यानंतर उथप्पा (२) रियान पराग (१) आणि राहुल तेवतिया (१४) या फलंदाजांनाही मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या टॉम करनने विजयासाठी प्रयत्न केले खरे पण त्याला दुसऱ्या बाजूने कोणाचाही साथ लाभली नाही. टॉम करनने ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावा केल्या, तर जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट आणि अंकित राजपूत हे एकेरी धावसंख्येवरच बाद झाले. कोलकाताकडून शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ तर सुनील नरिन, प‌ॅट कमिन्स आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

तत्त्पूर्वी, नाणेफेक जिंकून राजस्थानने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर शुबमन गिल आणि मधल्या फळीतील फलंदाज इयान मॉर्गन यांच्या योगदानामुळे कोलकाताने राजस्थानसमोर २० षटकात ६ बाद १७४ धावा केल्या. सलामीवीर सुनिल नरेन (१५) लवकर माघारी परतल्यानंतर शुबमनने नितिश राणासोबत संघाची धावसंख्या वाढवली. मागच्या सामन्यात मोठी कामगिरी केलेल्या राहुल तेवतियाने नितिश राणाला (२२) बाद केले. तर, शुबमन ५ चौकार आणि एका षटकारासह ४७ धावांवर बाद झाला. जोफ्रा आर्चरने स्वत: च्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला. या दोघानंतर आंद्रे रसेलने ३ षटकारांसह १४ चेंडूत २४ धावांची खेळी केली. रसेल मोठी खेळी करणार असे वाटत असताना अंकित राजपूतने त्याला बाद केले.

कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक (१) धावा जमवण्यात पुन्हा अपयशी ठरला. कार्तिकनंतर मॉर्गन मैदानात आला. त्याने एका बाजूने किल्ला लढवत संघाची धावसंख्या दीडशेपार नेली. मॉर्गन १ चौकार आणि २ षटकारांसह ३४ धावांवर नाबाद राहिला. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरला दोन तर, अंकित राजपूत, जयदेव उनाडकट, टॉम करन आणि राहुल तेवतियाने प्रत्येकी एक बळी घेतला.

LIVE UPDATE :

  • कोलकाता रायडर्सने राजस्थानला ३७ धावांनी धूळ चारली.
  • टॉम करनच्या नाबाद ५४ धावा, खेळीत ३ षटकार आणि २ चौकारांचा समावेश.
  • राजस्थानला विजयासाठी ३० चेंडूत ८५ धावांची गरज.
  • पंधरा षटकानंतर राजस्थानच्या ८ बाद ९० धावा.
  • जयदेव उनाडकट मैदानात.
  • आर्चर एक षटकार ठोकून माघारी, चक्रवर्तीचा दुसरा बळी.
  • राजस्थानला आठवा धक्का.
  • जोफ्रा आर्चर मैदानात.
  • टॉम करननची संघासाठी एकतर्फी झुंज.
  • नरिनने श्रेयस गोपालला केले बाद.
  • श्रेयस गोपाल मैदानात.
  • राहुल तेवतिया १४ धावांवर बाद, चक्रवर्तीला मिळाला तेवतियाचा बळी.
  • दहा षटकानंतर राजस्थानच्या ५ बाद ६१ धावा.
  • राजस्थानला विजयासाठी ७२ चेंडूत १३२ धावांची गरज.
  • ५० धावांच्या आत राजस्थानचा अर्धा संघ तंबूत.
  • राहुल तेवतिया मैदानात.
  • रियान पराग १ धावांवर बाद, नागरकोटीचा दुसरा बळी.
  • रॉबिन उथप्पा २ धावांवर बाद, कमलेश नागरकोटीला मिळाला बळी.
  • राजस्थानला चौथा धक्का.
  • रियान पराग मैदानात.
  • जोस बटलर २१ धावांवर बाद, शिवम मावीने केले बाद.
  • पाच षटकात राजस्थानच्या २ बाद ३६ धावा.
  • उथप्पा मैदानात.
  • राजस्थानला धक्का, संजू ८ धावांवर बाद. शिवम मावीने केले बाद.
  • संजू सॅमसन मैदानात.
  • स्मिथ ३ धावांवर माघारी, कमिन्सने केले बाद.
  • पहिल्या षटकात राजस्थानच्या बिनबाद १२ धावा.
  • जोस बटलरकडून डावाचा पहिला षटकार.
  • सुनील नरिन टाकतोय कोलकातासाठी पहिले षटक.
  • राजस्थानचे सलामीवीर स्टिव्ह स्मिथ आणि जोस बटलर मैदानात.
  • २० षटकात कोलकाताच्या ६ बाद १७४ धावा.
  • कमलेश नागरकोटी मैदानात.
  • टॉम करनच्या गोलंदाजीवर सॅमसनने घेतला कमिन्सचा अप्रतिम झेल.
  • पॅट कमिन्स अठराव्या षटकात १२ धावांवर बाद.
  • इयॉन मॉर्गन आणि प‌ॅट कमिन्सची जोडी मैदानात.
  • १५ षटकानंतर कोलकाताच्या ५ बाद १२० धावा.
  • रसेलच्या १४ चेंडूत २४ धावा.
  • आंद्रे रसेल २४ धावांवर बाद, अंकित राजपूतने धाडले माघारी.
  • दिनेश कार्तिक पुन्हा अपयशी. आर्चरने केले १ धावेवर बाद.
  • १३ षटकानंतर कोलकाताच्या ३ बाद १०६ धावा.
  • तेराव्या षटकात रसेलचा पहिला षटकार.
  • कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक मैदानात.
  • शुबमनच्या खेळीत ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
  • शुबमनला जोफ्रा आर्चरने धाडले माघारी.
  • कोलकाताचा सलामीवीर शुबमन गिल ४७ धावांवर बाद.
  • आंद्रे रसेल मैदानात.
  • दहा षटकानंतर कोलकाताच्या २ बाद ८२ धावा.
  • नितीश राणा २२ धावांवर माघारी, तेवतियाच्या गोलंदाजीवर परागने घेतला झेल.
  • पाच षटकानंतर कोलकाताच्या १ बाद ३६ धावा.
  • नितीश राणा मैदानात.
  • कोलकाताचा नरिन १५ धावांवर माघारी, उनाडकटने उडवला त्रिफळा.
  • दुसऱ्या षटकात उथप्पाने सोडला नरिनचा झेल.
  • शुबमनकडून सामन्याचा पहिला षटकार.
  • पहिल्या षटकात कोलकाताला मिळाली फक्त एक धाव.
  • जोफ्रा आर्चर टाकतोय राजस्थानसाठी पहिले षटक.
  • कोलकाताचे सलामीवीर सुनील नरिन आणि शुबमन गिल मैदानात.
  • नाणेफेक जिंकून राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय.

राजस्थान रॉयल्सची प्लेईंग XI -

स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, जोफ्रा आर्चर, टॉम करन, श्रेयस गोपाल, रियान पराग, राहुल तेवतिया, अंकित राजपूत, जयदेव उनाडकट.

कोलकाता नाइट रायडर्सची प्लेईंग XI -

दिनेश कार्तिक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, नितीश राणा, शिवम मावी, शुबमन गिल, सुनील नरिन, प‌ॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती.

Last Updated : Sep 30, 2020, 11:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.