ETV Bharat / sports

आयपीएल सट्टेबाजी : चार जणांना गुरुग्राममधून अटक

गुरुग्राम पोलिसांचे प्रवक्ते सुभाष बोकेन म्हणाले, "विशिष्ट माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळावर छापा टाकला आणि आरोपींना अटक केली. हे सर्वजण चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळल्या जाणाऱ्या आयपीएल सामन्यावर सट्टा लावत होते."

four arrested from gurugram betting on IPL matches
आयपीएल सट्टेबाजी : चार जणांना गुरूग्राममधून अटक
author img

By

Published : Nov 3, 2020, 3:59 PM IST

Updated : Nov 4, 2020, 3:39 PM IST

गुरुग्राम - गुरुग्राम पोलिसांनी आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजीच्या आरोपाखाली चार जणांना अटक केली आहे. गुरुग्राममधील सेक्टर ४२ येथून चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चार मोबाइल फोन, एक लॅपटॉप, दोन फोन चार्जर, एक लॅपटॉप चार्जर, एक रजिस्टर आणि कॅल्क्युलेटर जप्त करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजेश, नीरज, कर्ण आणि राकेश अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुरुग्राम पोलिसांचे प्रवक्ते सुभाष बोकेन म्हणाले, "विशिष्ट माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळावर छापा टाकला आणि आरोपींना अटक केली. हे सर्वजण चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळल्या जाणाऱ्या आयपीएल सामन्यावर सट्टा लावत होते."

या संशयितांनी लोकांना आयपीएल सामन्यांवरील सट्टा लावण्याचे आमिष दाखवले होते. या आरोपींवर गुरुग्राममधील सुशांत लोक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

Last Updated : Nov 4, 2020, 3:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.