अबुधाबी - आयपीएलमध्ये शुक्रवारी ५०वा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या संघात पार पडला. यात राजस्थानने पंजाबची विजयी घोडदौड रोखली. पंजाबकडून आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने ९९ धावांची खेळी केली. मात्र, राजस्थानने पंजाबवर सात गड्यांनी सहज विजय नोंदवला. पंजाबला मात खावी लागली असली, तरी गेलच्या एका मोठ्या विक्रमाने त्याचे चाहते सुखावले आहेत.
गेलने या सामन्यात ६३ चेंडूत ६ चौकार आणि ८ षटकारांसह ९९ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीदरम्यान त्याने टी-२० क्रिकेट प्रकारात १००० षटकार मारण्याचा कारनामाही केला. असा कारनामा करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
-
1️⃣0️⃣0️⃣0️⃣ T20 sixes for Christopher Henry Gayle.
— ICC (@ICC) October 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
That's it. That's the post 🤷 pic.twitter.com/wkCViJAYmX
">1️⃣0️⃣0️⃣0️⃣ T20 sixes for Christopher Henry Gayle.
— ICC (@ICC) October 30, 2020
That's it. That's the post 🤷 pic.twitter.com/wkCViJAYmX1️⃣0️⃣0️⃣0️⃣ T20 sixes for Christopher Henry Gayle.
— ICC (@ICC) October 30, 2020
That's it. That's the post 🤷 pic.twitter.com/wkCViJAYmX
पंजाबच्या डावाच्या २०व्या षटकात राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर गोलंदाजी करायला आला. त्याच्या या षटकाच्या तिसर्या चेंडूवर षटकार खेचत गेलने ९९ धावांवर मजल मारली. गेलला शतक ठोकण्यासाठी फक्त एक धाव घ्यायची होती. पण चौथ्या चेंडूवर आर्चरने त्याचा त्रिफळा उडवला.
ख्रिस गेलची टी-२० कारकीर्द -
गेलने आत्तापर्यंत ४१० टी-२०सामने खेळले असून यात त्याने ३८.३३ च्या सरासरीने १३५७२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २२ शतके आणि ८५ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने आत्तापर्यंत १०४१ चौकार आणि १००१ षटकार मारले आहेत.