ETV Bharat / sports

मुंबईचा संघर्षपूर्ण विजय; एबी डिव्हीलियर्सची स्फोटक खेळी - mumbai

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने बाजी मारली. मुंबईचा हा पहिला विजय ठरला.

धावबाद केल्यानंतर जल्लोष करणारे मुंबई इंडियन्सचे खेळाडू
author img

By

Published : Mar 29, 2019, 1:03 AM IST

बंगळुरू - चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या आयपीएलच्या सातव्या सामन्यात बंगळुरूच्या संघाचा मुंबई इंडियन्सने ६ धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने बंगळुरूच्या संघापुढे १८८ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, बंगळुरुला२० षटकात ५ बाद १८२ धावापर्यंत मजल मारता आली.

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने बाजी मारली. मुंबईचा हा पहिला विजय ठरला. क्रिकेट ३६० म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिव्हीलियर्सने ताबडतोब धावांची खेळी केली. तो बंगळुरु गोलंदाजांच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या तरीही संघास विजय मिळवून देता आला नाही. त्याने ४१ चेंडूत ७० धावा काढल्या. यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल २२ चेंडूत ३१ धावा काढून बाद झाला. मोईन अलीला रोहितने १३ धावबाद केले. त्यानंतर विराट आणि एबीने सामन्यांची सूत्रे हाती घेत फलक धावत ठेवला. कोहलीने ३२ चेंडूत ४६ धावा कुटल्या. त्यात ६ चौकारांचा समावेश होता. त्याला बुमराहाने बाद केले. शिमरोन हेटमेयरला या सामन्यातही छाप टाकता आली नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने ३ तर मंयकने १ गडी बाद केला.

बंगळुरूच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला २० षटकात ८ बाद १८७ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सचा संघ युझवेंद्र चहलच्या फिरकी जाळ्यात अडकला. त्याने ३८ धावा देत महत्वपूर्ण ४ बळी घेतले. विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईची सलामी जोडी रोहित-डी कॉक यांनी बंगळुरूच्या गोलंदाजांवर हल्ला केला. त्यांनी ५४ धावांची सलामी दिली. रोहित शर्माने ३३ चेंडूत ४८ धावा केल्या. त्याचे अर्धशतक २ धावांनी हुकले. त्यात १ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. डी कॉकने २० चेंडूत २३ तर युवराज सिंगने १२ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले. युवराज चहलच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात बाद झाला. सूर्यकुमार यादवने झटपट ३८ धावा झोडपून काढल्या. त्यानंतर किरोन पोलार्ड आणि कृणाल पंड्या यांनी चाहत्यांना निराशा केली. हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात सिराजला २ षटकार खेचत मुंबईची धावगती वाढवली. पंड्याने १४ चेंडूत ३ षटकारांसह ३२ धावा कुटल्या.

Intro:Body:

मुंबईचा संघर्षपूर्ण विजय; एबी डिव्हीलियर्सची स्फोटक खेळी

बंगळुरू - चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या आयपीएलच्या सातव्या सामन्यात बंगळुरूच्या संघाचा मुंबई इंडियन्सने ६ धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने बंगळुरूच्या संघापुढे १८८ धावांचे आव्हान दिले आहे. हे आव्हान बंगळुरूच्या संघास पार करता आले नाही. त्यांनी २० षटकात ५ बाद १८२ धावा करता आल्या.

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने बाजी मारली. मुंबईचा हा पहिला विजय ठरला. क्रिकेट ३६० म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिव्हीलियर्सने ताबडतोब धावांची खेळी केली. तो बंगळुरु गोलंदाजांच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या तरीही संघास विजय मिळवून देता आला नाही.  त्याने ४१ चेंडूत ७० धावा काढल्या.

यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल २२ चेंडूत ३१ धावा काढून बाद झाला.  मोईन अलीला रोहितने १३ धावबाद केले. त्यानंतर विराट आणि एबीने सामन्यांची सूत्रे हाती घेत फलक धावत ठेवला. कोहलीने ३२ चेंडूत ४६ धावा कुटल्या. त्यात ६ चौकारांचा समावेश होता. त्याला बुमराहाने बाद केले. शिमरोन हेटमेयरला या सामन्यातही छाप टाकता आली नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने ३ तर मंयकने १ गडी बाद केला.

बंगळुरूच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला २० षटकात ८ बाद १८७ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सचा संघ युझवेंद्र चहलच्या फिरकी जाळ्यात अडकला. त्याने ३८ धावा देत महत्वपूर्ण ४ बळी घेतले.

विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईची सलामी जोडी रोहित-डी कॉक यांनी बंगळुरूच्या गोलंदाजांवर हल्ला केला. त्यांनी ५४ धावांची सलामी दिली. रोहित शर्माने ३३ चेंडूत ४८ धावा केल्या. त्याचे अर्धशतक २ धावांनी हुकले. त्यात १ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. डी कॉकने २० चेंडूत २३ तर युवराज सिंगने १२ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले.

युवराज चहलच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात बाद झाला. सूर्यकुमार यादवने झटपट ३८ धावा झोडपून काढल्या. त्यानंतर किरोन पोलार्ड आणि कृणाल पंड्या यांनी चाहत्यांना निराशा केली. हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात सिराजला २ षटकार खेचत मुंबईची धावगती वाढवली. पंड्याने १४ चेंडूत ३ षटकारांसह ३२ धावा कुटल्या.

बंगळुरूकडून उमेश यादवने भेदक मारा करत मुंबईच्या २ फलंदाजांना बाद केले. मोहम्मद सिराजने २  गडी बाद करत सुरेख साथ दिली. नवदीप सैनी आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांना एकही गडी टिपता आला नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.