नवी दिल्ली- टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने टीम इंडियाचा हेड कोच होण्यास होकार दिला आहे. राहुल द्रविडने या निवडीसाठी आपला होकार कळवला आहे. टी-२० विश्वकरंडकानंतर द्रविड टीम इंडियाचा कोच म्हणून जबाबदारी स्विकारणार आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांच्यात काल महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला राहुल द्रविड उपस्थित होता. या दरम्यान तिघांमध्ये हेड कोच या पदावर चर्चा झाली. त्यानंतर द्रविडने हेड कोच होण्यास होकार दिला आहे.
रवी शास्त्री यांचा करार समाप्त
टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री यांचा करार १७ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकानंतर समाप्त होणार आहे. रवी शास्त्री यांना मुदतवाढ मिळावी, अशी बीसीसीआयची भूमिका आहे. पण रवी शास्त्री स्वतः अशी मुदतवाढ मिळण्यासाठी इच्छूक नाहीत. त्यांनी यासंदर्भात बीसीसीआयला आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे हे पद पुढे रिकामे राहण्याची शक्यता आहे.