सेंच्युरियन - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला. भारताने तिसऱ्या दिवशी 327 धावा केल्या आहेत. दरम्यान उपाहारापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 1 गडी गमावून 21 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गरने 1 धाव काढून पॅव्हेलियन गाठला, तर जसप्रीत बुमराहने भारताला हे यश मिळवून दिले.
याआधी भारतीय संघाने ३२७ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये केएल राहुलने भारतासाठी या डावात शतक झळकावले. राहुलने 260 चेंडूत 123 धावा केल्या.
त्यानंतर मयंक अग्रवालने 60 धावा केल्या, तर कोहलीने 35 धावा जोडल्या. रहाणेने 48 धावा केल्या मात्र त्याचे अर्धशतक 2 धावांनी हुकले. शेवटी, बुमराहने 2 चौकार मारले, यात त्याने 14 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
दक्षिण आफ्रिकेकडून एनगिडीने 6 आणि रबाडाने 3 बळी घेतले. या दोघांशिवाय अन्य कोणताही गोलंदाज विकेट घेण्यात यशस्वी होऊ शकला नाही.
हेही वाचा - Ganguly Hospitalised : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली कोविड पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल