ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : सीएसकेला मोठा झटका बसण्याची संभावना ; दीपक चहर सुरुवातीच्या सामन्याला मुकणार? - National Cricket Academy

आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्जने ( Chennai Super Kings ) दीपक चहरला 14 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. परंतु नुकत्याच वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान या वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Deepak Chahar
Deepak Chahar
author img

By

Published : Mar 2, 2022, 7:48 PM IST

नवी दिल्ली : आयपीएल 2022 या स्पर्धेचा ( IPL 2022 Tournament ) थरार 26 मार्च पासून रंगणार आहे. या अगोदर आयपीएल स्पर्धेत सहभागी असलेल्या 10 संघांनी आपली स्पर्धेची तयारी केली आहे. परंतु आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक समजल्या जाणाऱ्या संघाच्या ताफ्यात चिंता दिसून येत आहे. कारण ईएसपीएन क्रिकइन्फोने बुधवारी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये म्हणले आहे की, दुखापतग्रस्त दीपक चहर ( Injured Deepak Chahar ) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या IPL 2022 च्या मोसमातील सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडला आहे.

कोलकाता येथील वेस्ट इंडिजविरुद्धच्या अंतिम टी-20 मध्ये भारताकडून खेळताना चहरला दुखापत झाली होती. त्यानंतर तो श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला. चहर पुढील व्यवस्थापनासाठी आणि दुखापतीतून सावरण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ( National Cricket Academy ) येथे आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फो रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, दीपक चहरला मागील महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध खेलवण्यात आलेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्या दरम्यान दुखापत झाली होती. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी काही आठवडे लागण्याची शक्यता आहे. याचा अर्थ तो आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यातून बाहेर होऊ शकतो. आयपीएल 2022 ( Indian Premier League 2022 ) ची स्पर्धा 26 मार्च ते 29 मे दरम्यान खेळवली जाणार आहे. दीपक चहर बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून अंतिम मूल्यांकनाची वाट पाहत आहे, जिथे चहर सध्या तो रिहॅबमधून जात आहे.

चहर भारतीय संघासोबतच्या कामगिरीने खूप उत्साहित होता. केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याने 2/54 बळी घेतले होते. त्याचबरोबर त्याने 54 धावांची जलद खेळी साकारली होती. परंतु तरीही भारताचा चार धावांनी पराभव झाला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये, चहरने गोलंदाजी करताना 2/53 आणि 2/41 घेण्याव्यतिरिक्त 54 आणि 38 धावा केल्या होत्या. दुखापत होण्याआधी, चहरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या अंतिम T20 मध्ये दोन विकेट घेतल्या होत्या.

भारतीय संघासाठी प्रभावी कामगिरी करणाऱ्या दीपक चहरसाठी सीएसकेने आयपीएल मेगा लिलावात ( IPL mega auction ) 14 कोटींना विकत घेतले होते. चहरसाठी सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सने प्रथम बोली लावली. चहरच्या मूल्याने 10 कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर दोन्ही फ्रँचायझींनी पूर्ण ताकद लावली. हैदराबादने पुन्हा माघार घेतली आणि चेन्नई रिंगणात उतरली. राजस्थान रॉयल्सने 13.25 कोटी रुपयांची बोली लावली होती. परंतु चेन्नईने चहरला 14 कोटी रुपयांमध्ये परत खरेदी करण्यात यश मिळवले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.