दुबई - पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणाऱ्या क्रिकेट संघाची नावे समोर आली आहे. आयसीसीने आज या संघाची घोषणा केली. पुढील वर्षी ही स्पर्धा २८ जुलै ते ८ ऑगस्ट या दरम्यान इंग्लंडच्या बर्मिंघम शहरात होणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, कॅरिबियन टीम आणि इंग्लंड या संघांनी यात क्वालीफाय केलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आयसीसी आणि राष्ट्रकुल फेडरेशनने आज २०२२ राष्ट्रकुलसाठी पात्र ठरलेल्या क्रिकेट संघाची घोषणा केली. तब्बल २२ वर्षानंतर पहिल्यांदा क्रिकेट संघ राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार आहेत. याआधी १९९८ साली पुरुष क्रिकेट संघांनी राष्ट्रकुलमध्ये सहभाग घेतला होता. क्वालुमपूरमध्ये झालेल्या या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली होती.
२०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ८ महिला क्रिकेट संघ सहभागी होतील. टी-२० फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होणार आहे. आयसीसी महिला टी-२० क्रमवारीनुसार अव्वल संघांना याचे तिकीट मिळाले आहे. आयसीसी आणि राष्ट्रकुल फेडरेशनने आठवा संघ पात्रतेनुसार निवडला जाईल, असे सांगितलं आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या भीतीने खेळाडू IPL मधून माघार घेत आहेत, BCCI म्हणते...
हेही वाचा - IPL २०२१ : मुंबईच्या विदेशी खेळाडूचा भारतात राहण्याचा निर्धार, म्हणाला...