मुंबई - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघासाठी कडक क्वारंटाईन नियमावली तयार केली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ जूनपासून साऊदम्पटनच्या मैदानावर रंगणार आहे. पण, भारतातील कोरोनाची स्थिती पाहता, बीसीसीआयला कोणताही धोका पत्करायचा नाही. यामुळे त्यांनी कडक नियमावली तयारी केली आहे.
बीसीसीआयच्या नियमानुसार, भारतीय संघाचा क्वारंटाईन कालावधी दोन टप्प्यात असेल. २५ मे पासून हे खेळाडू भारतात बायो बबलमध्ये राहतील. त्यानंतर २ जूनला इंग्लंडला पोहोचल्यानंतर तिथेही दहा दिवस क्वारंटाईन राहणार आहेत.
एएनआयच्या माहितीनुसार, इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेले खेळाडू कुटुंबासोबत २५ मे रोजी मुंबईत एकत्रित येणार आहेत. ते ८ दिवस मुंबईत तयार केलेल्या बायो बबलमध्ये राहणार आहेत. यावेळी दोन-तीन वेळा त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या खेळाडूंना तसेच त्यांच्या कुटुंबाला विशेष विमानाने इंग्लंडला घेऊन जाण्यात येणार आहे. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतरसुद्धा त्या सर्वांना पुढील १० दिवस क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा - करीनाच्या गाण्यावर प्राचीचा भन्नाट बेली डान्स; फिदा झालेला पृथ्वी शॉ म्हणाला 'कातिलाना'
हेही वाचा - दु:खद : चेतन सकारियाच्या वडिलांचे कोरोनाने निधन