हैदराबाद : श्रीलंकेचा व्हाईटवॉश केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता न्यूझीलंड विरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. वनडे मालिकेतील पहिल्या सामना 18 जानेवारीला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्यापूर्वी हैदराबादचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की, सिराजने गेल्या एका वर्षात बरीच मोठी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे सिराजने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वाधिक बळी घेतले होते.
-
🗣️🗣️'Siraj is an important player for India'
— BCCI (@BCCI) January 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Hear what #TeamIndia captain @ImRo45 has to say on local lad @mdsirajofficial ahead of the first #INDvNZ ODI in Hyderabad pic.twitter.com/XoSSOplZ20
">🗣️🗣️'Siraj is an important player for India'
— BCCI (@BCCI) January 17, 2023
Hear what #TeamIndia captain @ImRo45 has to say on local lad @mdsirajofficial ahead of the first #INDvNZ ODI in Hyderabad pic.twitter.com/XoSSOplZ20🗣️🗣️'Siraj is an important player for India'
— BCCI (@BCCI) January 17, 2023
Hear what #TeamIndia captain @ImRo45 has to say on local lad @mdsirajofficial ahead of the first #INDvNZ ODI in Hyderabad pic.twitter.com/XoSSOplZ20
सिराजमुळे श्रीलंका 73 धावांत ऑलआउट : रोहित शर्माने सांगितले की, श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सिराजने 4 विकेट घेतल्या. त्याच्या मदतीनेच भारताने श्रीलंकेचा 317 धावांच्या फरकाने पराभव केला होता. हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. या मालिकेत मोहम्मद सिराजने 3 वनडेत 9 विकेट घेतल्या. सिराजने शेवटच्या सामन्यात 10 षटकात 32 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या. त्याने नवीन चेंडूच्या बळावर श्रीलंकेच्या टॉप ऑर्डरला अडचणीत आणले होते. त्याच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला केवळ 73 धावांत ऑलआउट केले. रोहित शर्मा म्हणाला, 'आम्ही सर्व प्रयत्न केले, पण दुर्दैवाने सिराज 5 विकेट घेऊ शकला नाही.
-
🔊 Sound 🔛#TeamIndia captain @ImRo45 gets into the groove ahead of the #INDvNZ ODI series opener 👍 👍 pic.twitter.com/NR6DaK56mg
— BCCI (@BCCI) January 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🔊 Sound 🔛#TeamIndia captain @ImRo45 gets into the groove ahead of the #INDvNZ ODI series opener 👍 👍 pic.twitter.com/NR6DaK56mg
— BCCI (@BCCI) January 17, 2023🔊 Sound 🔛#TeamIndia captain @ImRo45 gets into the groove ahead of the #INDvNZ ODI series opener 👍 👍 pic.twitter.com/NR6DaK56mg
— BCCI (@BCCI) January 17, 2023
रोहितही सिराजच्या गोलंदाजीचा चाहता : रोहित शर्मा म्हणाला की, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद सिराजच्या काही युक्त्या कामी आल्या. 2019 मध्ये पदार्पण केल्यापासून या युवा वेगवान गोलंदाजाने त्याच्या खेळात बरीच प्रगती केली आहे. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने संघासाठी ही चांगली बातमी आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजने चमकदार कामगिरी केली आहे. सिराजने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, तो कौतुकास पात्र आहे. गेल्या काही वर्षांत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे. तो सातत्याने चांगले प्रदर्शन करतो आहे, जे भारतीय क्रिकेटसाठी चांगले आहे.
भारताचा श्रीलंकेवर विक्रमी विजय : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव केला होता. वनडे इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी वनडेतील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. 2008 मध्ये न्यूझीलंडने आयर्लंडचा 290 धावांनी पराभव केला होता. आता एकदिवसीय सामन्यात 300 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवणारा भारत पहिला देश बनला आहे.
हेही वाचा : India Vs Sri Lanka : भारताने नोंदवला वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय! श्रीलंकेचा तब्बल 317 धावांनी पराभव