मोहाली : भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka ) संघात दोन सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना पंजाब क्रिकेट असेसियनच्या आय.एस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. हा सामना विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना ( Virat Kohli 100th Test match ) आहे.
-
.@imVkohli breaches another milestone on his momentous day.
— BCCI (@BCCI) March 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
8000 and counting runs in whites for him 👏👏#VK100 @Paytm #INDvSL pic.twitter.com/EDZz9kPZwy
">.@imVkohli breaches another milestone on his momentous day.
— BCCI (@BCCI) March 4, 2022
8000 and counting runs in whites for him 👏👏#VK100 @Paytm #INDvSL pic.twitter.com/EDZz9kPZwy.@imVkohli breaches another milestone on his momentous day.
— BCCI (@BCCI) March 4, 2022
8000 and counting runs in whites for him 👏👏#VK100 @Paytm #INDvSL pic.twitter.com/EDZz9kPZwy
विराट कोहलीचा आठ हजार धावांचा टप्पा पार -
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या 100व्या कसोटी सामन्यात अजून एक विक्रम केला आहे. त्याने आपल्या 100 व्या सामन्यात 45 धावा करत आठ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने 70 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 256 धावा केल्या आहेत. सध्या रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा अनुक्रमे 44 आणि 11 धावांवर नाबाद आहेत.
-
FIFTY!
— BCCI (@BCCI) March 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A fine half-century from @Hanumavihari in the 1st Test at Mohali. His 5th in Test cricket.
Live - https://t.co/c2vTOXAx1p #INDvSL @Paytm pic.twitter.com/qZsgup4AIZ
">FIFTY!
— BCCI (@BCCI) March 4, 2022
A fine half-century from @Hanumavihari in the 1st Test at Mohali. His 5th in Test cricket.
Live - https://t.co/c2vTOXAx1p #INDvSL @Paytm pic.twitter.com/qZsgup4AIZFIFTY!
— BCCI (@BCCI) March 4, 2022
A fine half-century from @Hanumavihari in the 1st Test at Mohali. His 5th in Test cricket.
Live - https://t.co/c2vTOXAx1p #INDvSL @Paytm pic.twitter.com/qZsgup4AIZ
भारतीय संघाने प्रथम खेळताना धावांची सुरुवात चांगली केली होती. भारताच्या सलामी फलंदाजांनी पहिल्या गड्यासाठी 52 धावांची खेळी केली होती. कर्णधार रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) 29 (28), मयंक अग्रवाल 33(49), हनुमा विहारी 58(128), विराट कोहली 45(76) आणि श्रेयस अय्यर 27(48) धावा केल्या.
पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघाची प्लेयिंग इलेव्हन -
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, पथुम निसांका, चरित अस्लंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), सुरंगा लकमल, विश्व फर्नांडो, लसिथ एम्बुल्डेनिया, लाहिरू कुमारा