मुंबई : सध्या भारताच्या दौऱ्यावर वेस्ट इंडिजचा संघ आहे. या दोन संघात वनडे मालिका पार पडली आहे. त्याचबरोबर या दोन संघात बुधवार ( 16 फेब्रुवारी) पासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तसेच या मालिकेनंतर श्रीलंकेचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर ( SL team on tour to India ) टी-20 आणि कसोटी मालिका खेण्यासाठी येणार आहे. त्यासाठीच्या वेळापत्रकात बीसीसीआयने ( Board of Control for Cricket in India ) बदल केला आहे. तसेच याबाबतची माहिती मंगळवारी देण्यात आली आहे.
-
🚨 NEWS 🚨: BCCI announces a change in schedule for the upcoming @Paytm Sri Lanka Tour of India. #INDvSL #TeamIndia
— BCCI (@BCCI) February 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
More Details 🔽
">🚨 NEWS 🚨: BCCI announces a change in schedule for the upcoming @Paytm Sri Lanka Tour of India. #INDvSL #TeamIndia
— BCCI (@BCCI) February 15, 2022
More Details 🔽🚨 NEWS 🚨: BCCI announces a change in schedule for the upcoming @Paytm Sri Lanka Tour of India. #INDvSL #TeamIndia
— BCCI (@BCCI) February 15, 2022
More Details 🔽
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिल्यांदा तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार ( India and Sri Lanka T20 series ) आहे. त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. ही मालिका आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 चा भाग असणार आहे. तसेच लखनऊ येथे पहिला टी-20 सामना होईल आणि त्यानंतरचे दोन टी-20 सामने धर्मशाळा येथे खेळले जातील.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला 4 मार्च पासून सुरुवात होईल. त्यानंतर दुसरा सामना 12 मार्च पासून सुरु होईल. यातील दुसरा सामना पिंक बॉल टेस्ट सामना ( Pink Ball Test match ) असणार आहे. जो बंगळुरु येथे पार पडेल.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मालिकेचे वेळपत्रक ( Schedule for IND vs SL Series ) :
पहिला टी-20 सामना - 24 फेब्रुवारी - लखनऊ
दुसरा टी-20 सामना - 26 फेब्रुवारी - धर्मशाळा
तिसरा टी-20 सामना - 27 फेब्रुवारी - धर्मशाळा
पहिला कसोटी सामना - 4 ते 8 मार्च - मोहाली
दुसरा कसोटी सामना - 12 ते 16 मार्च - बंगळुरु