धर्मशाला - वेस्ट इंडीजनंतर भारताने श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिकाही (IND vs SL 2nd T20) जिंकली आहे. धर्मशाला येथे खेळला गेलेला दुसरा टी-२० सामना भारताने ७ गडी राखून जिंकला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज पाथुम निसांकाचे दमदार अर्धशतक आणि कप्तान दासुन शनाकाच्या वादळी ४७ धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेने २० षटकात ५ बाद १८३ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात भारताकडून श्रेयस अय्यर (नाबाद ६९), संजू सॅमसन (३९) आणि रवींद्र जडेजा (१५ चेंडूत नाबाद ३९) यांनी धुवांधार फलंदाजी करत श्रीलंकेचे आव्हान १६ षटकातच पूर्ण केले.
- श्रेयस अय्यरने पाडला धावांचा पाऊस -
श्रीलंका संघाने दिलेल्या 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा झटपट माघारी परतला. रोहित शर्माला फक्त एक धाव करता आली. त्यानंतर ईशान किशनही 16 धावा काढून तंबूत परतला. पण श्रेयस अय्यरने एका बाजूने धावांचा पाऊस पाडला होता. श्रेयस अय्यरने आधी संजू सॅमसनसोबत आणि नंतर रविंद्र जाडेजासोबत भागिदारी करत भारताला विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यरने 44 चेंडूत 74 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान श्रेयस अय्यरने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. श्रीलंकाकडून कुमाराने दोन विकेट घेतल्या.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात कोणताही बदल नव्हता. पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला होता. श्रीलंका संघात दोन बदल करण्यात आले होते. पथुम निसांका याच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंका संघाने निर्धारित 20 षटकांत पाच बाद 183 धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रविंद्र जाडेजा आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. हर्षल पटेल सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला आहे. हर्षल पटेलच्या चार षटकात श्रीलंकेच्या फंलदाजांनी तब्बल 52 धावा वसूल केल्या.
- ऋतुराज गायकवाड बाहेर
केएल राहुल, दीपक चहर, सुर्यकुमार यादव हे खेळाडू सध्या दुखापतीमुळे बाहेर आहेत. त्यातच आता भारताचा फलंदाज ऋतुराज गायकवाड मनगटाच्या दुखापतीमुळे श्रीलंका विरूद्धच्या टी20 सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी मयंक अग्रवालचा समावेश संघात झाला आहे.
- भारतीय संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर,संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह
हेही वाचा - रियाला दर महिना 1 लाख पोटगी देण्याचे कोर्टाचे निर्देश; टेनिसपटू लिएंडर पेसला वांद्रे कोर्टाचा दणका