भारत आणि श्रीलंका दरम्यान होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने सहजरित्या विजय मिळविला आहे. तीन टी-20 सामन्याच्या मालिकेतील आज पहिला सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअममध्ये खेळण्यात आला. श्रीलंकेने टॉस जिंकून सुरुवातीला गोंलदांजीचा निर्णय घेतला आहे. फलंदाजीला उतरलेल्या भारताने 20 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावून 164 धावा केल्या. श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांपुढे पुरती शरणागती घेतल्याचे सामन्यात दिसून आले.
50 धावांवर श्रीलंकेला तीसरा धक्का
भारतीय गोलंदाजांनी सामन्यात भारताचे पुनरागमन केले आहे. श्रीलंकेच्या 3 विकेट्सही घेतल्या आहे. सध्या मैदानात अशेन बंडारा आणि चरीथ असलंका खेळत आहे.
पहिल्या 6 षटकांमध्ये गमावल्या 2 विकेट
- टीम इंडियाची सुरुवात आज चांगली राहिली नाही. सामना सुरू होताच पहिल्याच चेंडूत ओपनिंगला उतरेल्या पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला.
- यानंतर तीसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या संजू सॅमसनने सावध खेळ-खेळत डाव संभाळला. मात्र, सॅमसन 27 धावांवर बाद झाला. धवन आणि सॅमसन यांनी 51 धावांची पार्टनरशिप झाली.
- कर्नधार शिखर धवनचे अर्धशतक हुकले आहे. धवन 36 चेंडून 46 धावा बनवून बाद झाला आहे. त्याने सूर्यकुमार यादव सोबत तिसऱ्या विकेटसाठी 48 चेंडूमध्ये 62 धावांची भागीदारी केली.
- 129 धावांवर भारताला चौथा धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादव अर्धशतक बनवून बाद झाला आहे. यादवने 34 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या.
- 153 धावांवर भारतला पाचवा धक्का बसला आहे. हार्दिक पंड्या 10 धावांवर बाद झाला.
- भारताने 20 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावून 164 धावा केल्या आहेत.
दोन्ही संघ...
इंडिया : शिखर धवन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती
श्रीलंका : दासुन शनाका (कॅप्टन), अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (विकेटकीपर), धनंजय डेसिल्वा, चरीथ असलंका, अशेन बंडारा, वानिंदू हसारंगा, चमिका करुणारत्ने, इसुरू उदाना, अकिला धनंजय, दुष्मंथ चमीरा
हेही वाचा - IPL 2021 : आयपीएलचा दुसरा टप्पा युएईमध्ये रंगणार 19 सप्टेंबरपासून.. 'या' दोन दिग्गज संघात सलामीची लढत