ETV Bharat / sports

Shubman Gill Double Ton: भारताची पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर मात; शुभमन गिलने दुहेरी शतक करत रचला इतिहास

हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला आहे. भारताने प्रथम फलंदाजी न्यूझीलंडला 350 धावांचे लक्ष्य दिले होते. दरम्यान, भारतीय संघाला न्यूझीलंडला 337 धावांवर रोखण्यात यश आले आहे. तत्पूर्वी, आज शुभमन गिलने दुहेरी शतक करत इतिहास रचला आहे. दुहेरी शतक करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.

INDIA VS NEW ZEALAND SHUBMAN GILL BECOMES 5TH INDIAN TO SCORE DOUBLE CENTURY IN ODIS
शुभमन गिलने रचला इतिहास.. वनडेमध्ये दुहेरी शतक करणारा भारताचा पाचवा फलंदाज
author img

By

Published : Jan 18, 2023, 7:53 PM IST

Updated : Jan 18, 2023, 10:36 PM IST

हैदराबाद (तेलंगणा): येथे खेळल्या गेलेल्या अतिशय रोमांचक सामन्यात न्यूझीलंड संघाचा पराभव झाला आहे. भारतीय संघाने न्यूझीलंड संघापुढे 350 धावांचे लक्ष्य ठेवत त्यांचा12 धावांनी पराभव केला. मायदेशी खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय सलामीवीर शुभमन गिलची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. गिलने एका टोकाला दुहेरी शतक झळकावले. सलग तीन षटकार मारत त्याने आपले द्विशतक पूर्ण केले. एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक करणारा भारताचा तो पाचवा फलंदाज ठरला असून, त्याने भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास निर्माण केला आहे.

न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव : भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडपुढे 350 धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंड संघाकडून फलंदाजी करताना ब्रेसवेलने 78 चेंडूत 140 धावांची वादळी खेळी केलेली व्यर्थ ठरली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडला 337 धावांवर रोखून अवघ्या 12 धावांनी विजयी मिळवला आहे. न्यूझीलंड संघ 49.2 षटकात 337 धावांवर सर्वबाद झाला.

१९ चौकार आणि ९ षटकार: या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने त्यांचे तीन विकेट लवकर गमावले होते. मात्र सलामीवीर शुभमन गिल खंबीरपणे उभा राहिला. या सामन्यात गिलने पहिले द्विशतक पूर्ण केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा गिल हा 5वा भारतीय ठरला. गिलने 149 चेंडूत 208 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने 19 चौकार आणि 9 षटकार मारले.

गिल सर्वात जलद 1000 एकदिवसीय धावा करणारा भारतीय क्रिकेटर : बनला आहे. उजव्या हाताचा सलामीवीर शुभमन गिल न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या चालू असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्वात जलद 1000 एकदिवसीय धावा करणारा पहिला भारतीय बनला. 23 वर्षीय गिलने 19व्या वनडे डावात 1000 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी भारताकडून विराट कोहली आणि शिखर धवन यांनी याच 24-24 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. एकूणच बोलायचे झाले तर फखर जमाननंतर सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करणारा शुभमन गिल हा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानने 18 एकदिवसीय डावात ही कामगिरी केली आहे.

गिल दुहेरी शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला

  1. 23 वर्षे 132 दिवस शुभमन गिल विरुद्ध न्यूझीलंड, 2023
  2. 24 वर्षे 145 दिवस इशान किशन विरुद्ध बांगलादेश, चटगाव, 2022
  3. 26 वर्षे 186 दिवस रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बेंगळुरू, 2013

एकदिवसीय सामन्यांच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारे शीर्ष 10 फलंदाज

  1. रोहित शर्मा 265 धावा श्रीलंका विरुद्ध, 2014
  2. मार्टिन गुप्टिल 237* धावा विरुद्ध वेस्ट इंडिज, 2015
  3. वीरेंद्र सेहवाग 219 धावा विरुद्ध वेस्ट इंडीज, 2011
  4. ख्रिस गेल 215 धावा झिम्बाब्वे विरुद्ध, 2015
  5. फखर जमान 210 धावा विरुद्ध झिम्बाब्वे, 2015
  6. रोहित शर्मा 209 धावा ऑस्ट्रेलिया विरुद्ध, 2013
  7. रोहित शर्मा 208* धावा विरुद्ध श्रीलंका, 2017
  8. शुभमन गिल 208 धावा न्यूझीलंड विरुद्ध, 2023
  9. सचिन तेंडुलकर 200* धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2010

हेही वाचा: रोहितही झाला सिराजच्या गोलंदाजीचा फॅन म्हणाला

Last Updated : Jan 18, 2023, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.