ETV Bharat / sports

India vs New Zealand : भारत-न्यूझीलंड विश्वचषक सामन्यांत कोण करणार जादू? जाणून घ्या दोन्ही संघाचा आढावा

India vs New Zealand : विश्वचषक 2023 चा सामना भारत-न्यूझीलंड यांच्यात रविवारी 22 ऑक्टोबर रोजी धर्मशालात होणार आहे. या सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघांची विश्वचषक आणि वनडेची आकडेवारी काय आहे. विश्वचषकात सर्वाधिक धावसंख्या कोणाची आहे आणि सर्वात मोठा विजय कोणी नोंदवला आहे?

India vs New Zealand
India vs New Zealand
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 10:31 PM IST

हैदराबाद India vs New Zealand : भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामना रविवारी 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथील एचपीसीए क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यानंतर विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य फेरीचा संघ जवळपास निश्चित होईल. वास्तविक, दोन्ही संघांनी पहिले चार सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांचे 8-8 गुण आहेत. रनरेटच्या बाबतीत न्यूझीलंड पहिल्या, टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. धर्मशाला स्टेडियमवर सामना जिंकणाऱ्या संघाला 10 गुण मिळतील. सध्या तिसऱ्या, चौथ्या स्थानावर असलेल्या संघांना प्रत्येकी 4 गुण मिळालेले आहेत. अशा परिस्थितीत, धर्मशालात सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी राहण्याबरोबरच उपांत्य फेरीतील स्थान मिळवण्यास जवळपास निश्चित होईल. पण धर्मशाळेतील सामन्यापूर्वी भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्याबद्दल आम्ही तुम्हाला रंजक माहिती देणार आहेत.

विश्वचषकात न्यूझीलंडचं वर्चस्व : भारत -न्यूझीलंडचा संघ 1975 पासून विश्वचषकात 9 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी न्यूझीलंड संघानं 5 वेळा विजय मिळवला आहे. तर, टीम इंडियानं 3 वेळा विजय मिळवला आहे. याशिवाय एक सामना रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना धर्मशाला येथे विश्वचषकातील बदला घेण्याची संधी आहे. तर टीम इंडियाला 2019 च्या उपांत्य फेरीत हरवणाऱ्या न्यूझीलंड संघाला चितपट करीत सेमीफानयलमध्ये धडक द्याची आहे.

विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड : 1975 पासून खेळल्या जात असलेल्या क्रिकेट विश्वचषकात, आत्तापर्यंत 5 विश्वचषक स्पर्धा झाल्या आहेत. ज्यात दोन्ही संघाचा 1987-2019 च्या विश्वचषकात दोनदा सामना झालाय. 1987 मध्ये टीम इंडियानं दोन्ही सामने जिंकले होते, तर 2019 मध्ये एक सामना रद्द झाला होता. दुसरा सामना न्यूझीलंडनं जिंकला होता. विश्वचषकात न्यूझीलंडनं भारताविरुद्ध वर्चस्व गाजवत 5 वेळा वर्चस्व दाखवलं आहे.

विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या 253 : एक काळ असा होता की, 60 षटकांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये संघ 200 धावांचा टप्पा देखील स्पर्श करू शकत नव्हते, परंतु आज संघ 400 धावा पार करत आहेत. चालू विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेविरुद्ध 428 धावा केल्या. याशिवाय अनेक संघांनी यावेळी ३०० धावांचा टप्पा पार केला आहे. पण वर्ल्ड कपमधील भारत-न्यूझीलंडच्या आकडेवारीवर नजर टाकली तर टीम इंडियानं 1999 च्या विश्वचषकात 251 धावा केल्या होत्या. न्यूझीलंड संघानं 253 धावा करून सामना जिंकला होता. विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही संघांची ही सर्वोत्तम संघसंख्या आहे.

वनडे सामन्यांमध्ये टीम इंडियाचे वर्चस्व : विश्वचषकातील सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाचा वरचष्मा असला तरी आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघानं वर्चस्व राखलं आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 116 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारतानं 58 सामने जिंकले असून न्यूझीलंडनं 50 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील एक सामना बरोबरीत सुटला आहे, तर 7 सामने रद्द करण्यात आले आहेत.

विश्वचषकात शतके झळकावणारे खेळाडू : विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या एकूण 9 सामन्यांमध्ये आतापर्यंत केवळ दोनच खेळाडूंनी शतके झळकावली आहेत. ज्यामध्ये न्यूझीलंडचा कर्णधार ग्लेन टर्नर, भारतीय संघाचा महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या नावाचा समावेश आहे.

एकदिवसीय सामन्यांमध्ये शतके झळकावणारे खेळाडू : दोन्ही संघातील अनेक खेळाडूंनी एकदिवसीय सामन्यांमध्ये शतकं झळकावली आहेत. ज्यामध्ये भारताकडून सचिन तेंडुलकर, विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, रोहित शर्मा, शुभमन गिल, गौतम गंभीर, मोहम्मद कैफ, मोहिंद्र अमरनाथ, श्रेयस अय्यर, केएल राहुल, युसूफ पठाण यांचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या बाजूने, रॉस टेलर, नेशन अॅस्टल, केन विल्यमसन, मार्टिन गुप्टिल, टॉम लॅथम, ख्रिस केर्न्स, जेसी रायडर, रॉबर्ट रदरफोर्ड, मार्टिन क्रो, डेव्हिन कॉनवे, मायकेल ब्रेसवेल यांनी टीम इंडियाविरुद्ध वनडेमध्ये शतके झळकावली आहेत. मात्र, भारतीय संघाच्या वतीनं शुभमन गिलनं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या केवळ न्यूझीलंडविरुद्धच केली होती. ज्यामध्ये त्यानं द्विशतक झळकावताना 208 धावा केल्या.

हेही वाचा -

  1. ICC World CUP 2023 : विश्वचषकात भारतीय संघाची अप्रतिम कामगिरी, विरोधकाला पराभूत करण्याची न्यूझीलंड संघात ताकद
  2. World Cup २०२३ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात कोण मारणार बाजी?
  3. World Cup 2023 AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी पाडला धावांचा पाऊस, पाकिस्तानी गोलंदाज 'धुतल्यानं' 'हे' विक्रमही गेले वाहून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.