ETV Bharat / sports

लढवय्या स्टीव्ह स्मिथची भारताविरुद्ध हॅट्ट्रिक - स्टीव्ह स्मिथ लेटेस्ट न्यूज

भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेत सलग तीन शतके ठोकणारा स्मिथ चौथा फलंदाज ठरला आहे. आज भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्मिथने १०४ धावा करत शतक ठोकले. त्याने आपल्या खेळीत १४ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली.

steve smith became the fourth batsman to score hat-trick of tons against India
लढवय्या स्टीव्ह स्मिथची भारताविरुद्ध हॅट्ट्रिक
author img

By

Published : Nov 29, 2020, 2:43 PM IST

सिडनी - स्टीव्ह स्मिथ भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेत सलग तीन शतके ठोकणारा चौथा फलंदाज ठरला आहे. रविवारी सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) त्याने शतक ठोकत हा कारनामा केला. या सामन्याआधी स्मिथने १९ जानेवारी २०२०रोजी बंगळुरू येथे भारताविरुद्ध १३१ धावा केल्या. यानंतर, शुक्रवारी सिडनीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सध्याच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात स्मिथने १०५ धावा केल्या.

steve smith became the fourth batsman to score hat-trick of tons against India
स्टीव्ह स्मिथचा पराक्रम

हेही वाचा - ''मी गरोदर राहिले होते'', एका महिलेचे क्रिकेटपटू बाबर आझमवर गंभीर आरोप

आज भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्मिथने १०४ धावा करत शतक ठोकले. त्याने आपल्या खेळीत १४ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली. स्मिथच्या आधी १९८२मध्ये पाकिस्तानचे महान फलंदाज झहीर अब्बास, २०१२-१३मध्ये पाकिस्तानचा नासिर जमशेद आणि २०१३मध्ये क्विंटन डी कॉकने भारताविरुद्ध सलग तीन एकदिवसीय शतके ठोकली होती.

स्मिथचा अजून एक विक्रम -

आजच्या सामन्यात स्मिथने ६२ चेंडूत शतक पूर्ण केले. मागील सामन्यातही त्याने ६२ चेंडूवर शतक पूर्ण केले होते. यानिमित्ताने तो ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय मालिकेतील वेगवान शतक झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला. २०१५मध्ये सिडनी येथे श्रीलंकेविरुद्ध ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी ५१ चेंडूत सर्वात वेगवान शतक झळकावले होते. दुसर्‍या क्रमांकावर जेम्स फॉकनर आहे. त्याने २०१५मध्ये बंगळुरू येथे भारताविरुद्ध ५७ चेंडूत शतक ठोकले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.