ETV Bharat / sports

ब्रिस्बेन कसोटीत चमकला पालघरचा शार्दुल ठाकुर, आई-वडिलांनी केले कौतुक

author img

By

Published : Jan 19, 2021, 4:11 PM IST

Updated : Jan 19, 2021, 8:50 PM IST

१६ ऑक्टोंबर १९९१ रोजी शार्दूलचा जन्म पालघर तालुक्यातील माहीम येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव नरेंद्र ठाकुर तर आईचे नाव हंसा ठाकुर. क्रीडा शिक्षक असलेल्या वडिलांकडून शार्दुलला लहानपणीच क्रिकेटची आवड निर्माण झाली.

Palghar's Shardul Thakur shines in Brisbane Test
ब्रिस्बेन कसोटीत चमकला पालघरचा शार्दुल ठाकुर, आई-वडिलांनी केले कौतुक

पालघर - भारतीय क्रिकेट संघाने गाबा कसोटीत विजय मिळवत बॉर्डर-गावसकर मालिका २-१ने आपल्या नावावर केली. अंत्यत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात संघातील नवख्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. यात पालघरच्या मराठमोळ्या शार्दुल ठाकुरनेही आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. या कामगिरीमुळे पालघरमधील माहीम गावच्या शार्दूलचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आई-वडिलांनी शार्दुलचे केले कौतुक

गाबा कसोटीच्या पहिल्या डावात भारताने सहा फलंदाज दोनशे धावांच्या आत माघारी परतले होते. या संकटसमयी शार्दुल ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदर मैदानावर स्थिरावले. सुंदरसोबत शार्दुलनेही अर्धशतक झळकावले. त्याने ११५ चेंडूत ६७ धावा केल्या. यासोबतच्या त्याने पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ४ बळी घेत भारताला विजयाच्या जवळ नेले.

Palghar's Shardul Thakur shines in Brisbane Test
ब्रिस्बेन कसोटीत चमकला पालघरचा शार्दुल ठाकुर

शार्दुल ठाकुर

१६ ऑक्टोंबर १९९१ रोजी शार्दूलचा जन्म पालघर तालुक्यातील माहीम येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव नरेंद्र ठाकुर तर आईचे नाव हंसा ठाकुर. क्रीडा शिक्षक असलेल्या वडिलांकडून शार्दुलला लहानपणीच क्रिकेटची आवड निर्माण झाली.

Palghar's Shardul Thakur shines in Brisbane Test
शार्दुल ठाकुर

कारकीर्द -

२०१२-१३ साली शार्दुलला प्रथम मुंबई संघाकडून रणजी स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. २०१५-१६मध्ये त्याला किंग इलेव्हन पंजाब संघाकडून पहिल्यांदा आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. २०१६ साली त्याची वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी निवड झाली, पण त्याला संघात स्थान मिळू शकले नाही. त्यानंतर २०१७मध्ये तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. त्यानंतर २०१८मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले.

हेही वाचा - ''आयुष्यातील सर्वात मोठा क्षण'', सामनावीर रिषभ पंतने व्यक्त केली भावना

Last Updated : Jan 19, 2021, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.