ETV Bharat / sports

अजिंक्यचे कौतुक करणार नाही, असे का म्हणाले सुनील गावसकर, जाणून घ्या... - सुनील गावस्कर

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक सुरुवात केली. परंतु त्यावर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आपण अजिंक्यचे कौतुक करणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

i-will-not-appreciate-ajinkya-rahane-said-sunil-gavaskar
सध्यातरी मी अजिंक्यचे कौतुक करणार नाही; माजी कर्णधार सुनील गावस्कर यांची प्रतिक्रिया
author img

By

Published : Dec 26, 2020, 6:30 PM IST

मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत या सामन्याचे नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे आहे. त्याच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक सुरुवात केली. परंतु त्यावर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आपण अजिंक्यचे कौतुक करणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सामना संपल्यानंतर पहिल्या दिवसाच्या खेळाचे विश्लेषण करताना गावसकर बोलत होते.

कांगारुंना वरचढ व्हायची एकही संधी नाही -

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत आश्वासक सुरुवात केली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 195 धावांत गुंडाळल्यानंतर दिवसाअखेरीस भारताने मयांक अग्रवालच्या मोबदल्यात १ बाद ३६ पर्यंत मजल मारली. कर्णधार अजिंक्य रहाणेने या सामन्यात आपल्या नेतृत्त्वाची झलक दाखवत गोलंदाजीत बदल केले. तसेच त्याने कांगारुंना वरचढ व्हायची एकही संधी दिली नाही. अजिंक्यच्या या आश्वासक नेतृत्वानंतरही माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आपण अजिंक्यचे कौतुक करणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

तर आरोप माझ्यावर करण्यात येईल -

आपण लगेच निष्कर्षावर जायची घाई करायला नको. मी अजिंक्यचे कौतुक करून तो खूप चांगला कर्णधार आहे, असे म्हटले तर लगेच मी मुंबईच्या खेळाडूंना पाठिंबा देतो, असा आरोप माझ्यावर करण्यात येईल. त्यामुळे सध्यातरी मला या गोष्टींमध्ये अडकायचे नाही, अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर दिली.

शुबमन गिलने फटकेबाजी करत दडपण केले कमी -

दरम्यान 195 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल पहिल्याच षटकात स्टार्कच्या गोलंदाजीवर एकही धाव न काढता माघारी परतला. त्यामुळे टीम इंडिया बॅकफूटवर गेली. परंतू शुबमन गिलने फटकेबाजी करत संघावरचे दडपण कमी केले. ३८ चेंडूत २८ धावांच्या खेळीत गिलने ५ चौकार लगावले. तर दुसऱ्या बाजूने पुजारानेही त्याला उत्तम साथ दिली.

हेही वाचा - माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांना बॉक्सिंग डे कसोटीत वाहण्यात आली श्रद्धांजली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.