सिडनी - दुसर्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून विजयाचा घास हिरावून घेणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्कारानै गौरवण्यात आले. त्याने ४२ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मात्र, सामनावीर पुरस्कार टी. नटराजनला मिळायला हवा होता, असे मत हार्दिकने दिले आहे.

हेही वाचा - सामन्यात अपयशी ठरलेल्या चहलने नोंदवला 'खास' विक्रम
रविवारी सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने २० षटकांत पाच गडी गमावून १९४ धावा केल्या. नटराजन वगळता भारताच्या सर्व गोलंदाजांनी खूप धावा दिल्या. पण नटराजनने चार षटकांत केवळ २० धावा दिल्या आणि दोन गडी बाद केले.
पांड्या सामन्यानंतर म्हणाला, "मला वाटते की नटराजन सामनावीर हवा होता. त्याच्यामुळे १० धावा कमी असलेले लक्ष्य आम्हाला मिळाले.'' पांड्याने आपल्या फलंदाजीवरही भाष्य केले. तो म्हणाला, "मला धावफलक पाहून खेळायला आवडते. तुम्हाला कोणत्या प्रकारचे शॉट खेळावे लागतील, हे धावफलक सांगतो. लॉकडाउनच्या काळात विजयवीर बनण्यासाठी कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे, याचा मी सराव केला. तसेच अनेकांशी यासंबंधी चर्चाही केली. आयपीएलमध्येही मी अशा प्रकारच्या खेळ्या साकार केल्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना मला नेहमीच स्वत:च्या फटक्यांवर आधिक विश्वास वाटतो."