नवी दिल्ली - दुसर्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीला टीकेला सामोरे जावे लागत आहे. यात भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही आपले मत दिले. भारत सध्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर असून विराटसेनेने तीन सामन्यांपैकी दोन सामने गमावले आहेत.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना गंभीर म्हणाला, ''मला कर्णधारपदाची जबाबदारी समजली नाही. विकेट घेणे किती महत्त्वाचे आहे, यावर आपण सतत बोलत आहोत, जेणेकरुन आपण अशा प्रकारची फलंदाजी रोखू शकू. तुम्ही तुमच्या प्रमुख गोलंदाजांना नव्या चेंडूने गोलंदाजी करण्यासाठी फक्त दोन षटके देता. एकदिवसीय सामन्यात साधारणत: तीन स्पेल (४,३,३) असतात."
हेही वाचा - जलद २२ हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली पहिला फलंदाज
तो म्हणाला, "मला अशा प्रकारचे नेतृत्त्व समजू शकले नाही आणि ते मला सांगताही येणार नाही. हा टी-२० क्रिकेटचा प्रकार नाही. असे नेतृत्त्व चुकीचे आहे." गंभीर म्हणाला, की जर भारत अडचणीत असेल तर सहावा गोलंदाज म्हणून शिवम दुबे किंवा वॉशिंग्टन सुंदरचा विचार करू शकता. जर तुमच्याकडे कोणीही नसेल, तर तो निवडकर्त्यांचा दोष आहे.
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ६६ धावांनी पराभूत केले. तर, दुसर्या सामन्यात त्यांनी भारतावर ५१ धावांनी विजय मिळवला.