सिडनी - ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे मर्यादित षटकांच्या मालिकेतून म्हणजेच शेवटच्या एकदिवसीय आणि टी -२० मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी डार्सी शॉर्टचा संघात समावेश करण्यात आला आहे.
![David warner ruled out for rest of limited-overs series](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/d3988923f9eb08779c215564d3b629811606712789338-44_3011email_1606712800_232_3011newsroom_1606717480_982.jpg)
सिडनी क्रिकेट मैदानावर भारताविरुद्ध झालेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वॉर्नर जखमी झाला. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. आज सोमवारी या स्कॅनचा अहवाल येईल.
हेही वाचा - जलद २२ हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली पहिला फलंदाज
भारतीय डावाच्या चौथ्या षटकात वॉर्नरला दुखापत झाली. शिखर धवनचा खेळलेला चेंडू रोखण्यासाठी त्याने क्षेत्ररक्षण केले. या दरम्यान तो जखमी झाला. या दुखापतीनंतर तो विव्हळत होता. ऑस्ट्रेलियाच्या फिजिओने त्याला मैदानाबाहेर नेले. डेव्हिड वॉर्नरशिवाय पॅट कमिन्सलादेखील ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या उर्वरित सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे.
एकदिवसीय मालिकेचा शेवटचा सामना २ डिसेंबर रोजी कॅनबरा येथे खेळला जाईल. वॉर्नरने या मालिकेच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने दोन्ही सामन्यात अर्धशतक झळकावले. शिवाय कर्णधार आरोन फिंचबरोबर पहिल्या गड्यासाठी शतकी भागीदारी रचली.