मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्यांची पत्नी अनुष्का शर्मा एका मुलीचे पालक बनले आहेत. ११ जानेवारी रोजी विराट-अनुष्काच्या कुटुंबात एका गोंडस मुलीने जन्म घेतला. या बातमीमुळे विराट-अनुष्कावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने विराटला एक गमतीशीर सल्ला दिला आहे.
बाप झाल्यानंतर विराटने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर वॉर्नरने विराटला एक सल्ला दिला आहे. ''चांगली बातमी..अभिनंदन मित्रा..काही टिप्स पाहिजे असतील तर मला मेसेज कर'', असे वॉर्नरने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. वॉर्नर आयव्ही, इंडी आणि आयला या तीन मुलींचा बाबा आहे. २०१५ मध्ये वॉर्नरने कॅन्डिसशी लग्न केले.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विराटने अनुष्काच्या गरोदरपणाविषयी माहिती दिली होती. डिसेंबरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट अनुष्कासोबत वेळ घालवण्यासाठी मायदेशी परतला होता. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली.
करोनिएल
फार कमी लोकांना माहीत आहे की अनुष्का आणि विराटच्या मुलीला 'करोनिएल' म्हणून संबोधलं जाईल. याचं मुख्य कारण म्हणजे करोना काळात जन्माला आलेल्या बाळांना 'करोनिएल' या विशेष नावाने संबोधलं जातं. एवढंच नाही तर या महामारीच्या काळात जन्मलेल्या बाळांना 'कोविड- किड' असंही काही ठिकाणी म्हटलं जातं.
हेही वाचा - ICC Test Rankings : विराटचे दुसरे स्थानही गेले; अजिंक्य, अश्विनसह बुमराहला फटका