ETV Bharat / sports

ग्रीनच्या कसोटी पदार्पणाविषयी लँगर आशावादी

ग्रीन सोमवारी अ‍ॅडलेडमध्ये दाखल झाला आणि संघात सामील झाला. लॅंगर यांनी ग्रीनशी संवाद साधला. लॅंगर म्हणाले, "ग्रीनची कसोटी सामन्यात पदार्पण होण्याची बरीच शक्यता आहे. त्यांची स्थिती चांगली आहे. तो उद्या आणि बुधवारी प्रशिक्षण घेईल."

author img

By

Published : Dec 15, 2020, 9:43 AM IST

AUS vs IND: Green to make Test debut at Adelaide if he passes concussion Test, confirms Langer
ग्रीनच्या कसोटी पदार्पणाविषयी लँगर आशावादी

नवी दिल्ली - अ‌ॅडलेड येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करावे, अशी अपेक्षा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी व्यक्त केली आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर (एसीसीजी) भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया-अ संघांत सराव दुसरा सराव सामना खेळताना ग्रीनला दुखापत झाली.

हेही वाचा - दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या सीईओ कुगांद्री गोविंदर यांचे निलंबन

निवडकर्त्यांनी ग्रीनचा पर्याय म्हणून मोइसेस हेन्रिक्सचा संघात समावेश केला आहे. ग्रीन सोमवारी अ‍ॅडलेडमध्ये दाखल झाला आणि संघात सामील झाला. लॅंगर यांनी ग्रीनशी संवाद साधला. लॅंगर म्हणाले, "ग्रीनची कसोटी सामन्यात पदार्पण होण्याची बरीच शक्यता आहे. त्यांची स्थिती चांगली आहे. तो उद्या आणि बुधवारी प्रशिक्षण घेईल."

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला येत्या १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळला जाईल. अ‍ॅडलेड येथे प्रकाशझोतात खेळल्या जाणाऱ्या या कसोटीत भारताचे नेतृत्व केल्यानंतर कोहली पितृत्वाच्या रजेनिमित्त मायदेशी परतणार आहे. त्यामुळे उर्वरित तीन कसोटींमध्ये उपकर्णधार रहाणेच संघाचे नेतृत्व करणार, हे जवळपास निश्चित आहे.

असे आहे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अ‍ॅडलेड (दिवस-रात्र)
  • दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
  • तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ –सिडनी
  • चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गाबा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.