नवी दिल्ली - अॅडलेड येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दुसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १९१ धावांवर गुंडाळला. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २४४ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना ५३ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना नामोहरम करण्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने १८ षटकांत केवळ ५५ धावा देत हे ४ बळी घेतले.

हेही वाचा - फिफा क्रमवारी : भारतीय महिला संघाला दोन स्थानांचा फायदा
अश्विनसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत. त्याने संघाची मधली फळी उध्वस्त केली. अश्विनच्या खात्यात स्टीव्ह स्मिथचीही मोठी विकेट आहे. या कामगिरीनंतर अश्विन म्हणाला, ''स्मिथ किती चांगला फलंदाज आहे, हे आपल्याला माहितीच आहे. त्याला धावांची मोठी भूक आहे. त्याची विकेट महत्वाची होती. म्हणून मी तो बाद झाल्यावर आनंद लुटला आणि मी खरोखर आनंदी आहे."
गेल्या तीन दशकांत चार वेळा ऑस्ट्रेलिया दौरा -
रविचंद्रन अश्विनने गेल्या तीन दशकांत चार वेळा ऑस्ट्रेलिया दौरा केला. दोन वर्षांपूर्वी तो अॅडलेडमध्ये खेळला होता. २०१८-१९ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अश्विनला अॅडलेडमध्ये खेळण्याची मिळाली होती. तेव्हा त्याने दोन्ही डावांत प्रत्येकी ३ बळी घेतले होते. त्यानंतर फिटनेसच्या समस्येमुळे त्याला उर्वरित मालिकेतून बाहेर टाकण्यात आले.
अश्विन म्हणाला, "गेल्या १८ महिन्यात जेव्हा खेळायला गेलो आहे, तेव्हा मला खूप समाधान मिळाले आहे. मी प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकलो आहे. मला पुन्हा बसून राहायचे नाही. अद्याप एक डाव शिल्लक आहे आणि संपूर्ण मालिकेत मी चांगली कामगिरी करण्यास प्रयत्नशील असेन. त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची माझ्यासाठी चांगली संधी आहे."
अश्विन प्रथम २०१२ मध्ये अॅडलेडमध्ये खेळला आणि त्यानंतर त्यानंतर तो येथे २०१८ मध्ये परतला. २०१२ मध्ये त्याने २६७ धावांत पाच विकेट्स आणि २०१८ मध्ये १ १४९ धावांत सहा बळी घेतले. यावेळी त्याने पहिल्या डावात चार विकेट्स घेतल्या आहेत.