इंदूर : इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत भारताने मालिकेत सपशेल पराभव केला. या विजयासह भारताने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे. भारताने हैदराबादमधील पहिला एकदिवसीय सामना 12 धावांनी, तर रायपूरमधील दुसरा सामना वेगवान गोलंदाजांच्या मदतीने आठ गडी राखून जिंकला होता.
-
The new No.1 team in the @MRFWorldwide ICC Men's ODI Team Rankings 🤩
— ICC (@ICC) January 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
More 👉 https://t.co/sye7IF4Y6f pic.twitter.com/hZq89ZPO31
">The new No.1 team in the @MRFWorldwide ICC Men's ODI Team Rankings 🤩
— ICC (@ICC) January 24, 2023
More 👉 https://t.co/sye7IF4Y6f pic.twitter.com/hZq89ZPO31The new No.1 team in the @MRFWorldwide ICC Men's ODI Team Rankings 🤩
— ICC (@ICC) January 24, 2023
More 👉 https://t.co/sye7IF4Y6f pic.twitter.com/hZq89ZPO31
न्यूझीलंडची चौथ्या क्रमांकावर घसरण : या मालिका विजयासह भारतीय संघ 114 गुणांसह एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. 113 गुणांसह इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे ज्यांचे 112 गुण आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. न्यूझीलंडचे 111 रेटिंग गुण आहेत. दुसरीकडे, जर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची आगामी एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली तर ते पुरुषांच्या एकदिवसीय क्रमवारीत भारताला अव्वल स्थानावरून बाजूला करतील.
रोहित-गिलची शानदार भागीदारी : इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहित शर्मा (101) आणि शुभमन गिल (112) यांनी 212 धावांची शानदार भागीदारी केली. यानंतर हार्दिक पांड्या (54) आणि शार्दुल ठाकूर (25) यांच्या जलद धावांमुळे भारताने किवी संघासमोर 386 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 385 धावा केल्या. त्याचवेळी, प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाला 41 षटकांत केवळ 295 धावा करता आल्या. भारताने हा सामना 90 धावांनी जिंकून मालिका 3-0 अशी खिशात घातली.
रोहितचे तीन वर्षांनंतर शतक : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 101 धावांची शानदार खेळी केली. त्याने 85 चेंडूत 118 च्या स्ट्राईक रेटने 101 धावा केल्या. या दरम्यान त्याने 6 षटकार आणि 9 चौकार लगावले. रोहितने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय कारकिर्दीतील 30 वे शतक ठोकले आहे. विशेष म्हणजे रोहित शर्माचे शतक तब्बल 3 वर्षांनी झळकले आहे. यापूर्वी, रोहित शर्माने 19 जानेवारी 2020 रोजी बेंगळुरू येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 119 धावांची खेळी केली होती. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत रोहित शर्मा रिकी पाँटिंगसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
शुभमनच्या नावे नवा विक्रम : या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने कारकीर्दीतील चौथे एकदिवसीय शतक ठोकले. यासह त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमच्या विक्रमाची बरोबरी केली. शुभमनने तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 360 धावा केल्या. बाबर आझमने देखील 2016 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत 360 धावा काढत एका मालिकेत सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. गिलने अवघ्या 78 चेंडूत 112 धावा करत मालिकेतील आपले दुसरे शतक पूर्ण केले. यापूर्वी हैदराबादमध्ये, त्याने 208 धावा केल्या होत्या, त्यानंतर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला होता.
हेही वाचा : IND Vs NZ 3rd ODI : रोहीत शर्मा वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा फलंदाज