ETV Bharat / sports

IND vs WI 1st T-20 : वेस्ट इंडिज विरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा भारत तिसराच संघ - India v West Indies T20 series

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( India v West Indies ) यांच्यात टी-20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. ज्यामध्ये भारताने 6 विकेट्सने हा सामना जिकला. त्यानंतर भारतीय संघाने एक मोठ्या विक्रमाची ( India biggest record against West Indies ) नोंद आपल्या नावी केली आहे.

IND vs WI
IND vs WI
author img

By

Published : Feb 17, 2022, 12:21 PM IST

कोलकाता - सध्या वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर ( West Indies tour of India ) आहे. या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये वनडे आणि टी-20 मालिकेचे आयोजन केले आहे. यापैकी तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने जिंकली आहे. त्यानंतर बुधवार पासून टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी पार पडला. या सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवला ( IND beat WI by 6 wickets ). त्याचबरोबर भारतीय संघाने या सामन्यात एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी-20 ( India v West Indies T20 series ) सामन्यात भारतीय संघाने नाणेपेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी वेस्ट इंडिजला निमंत्रित केले. वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना, निकोलस पूरनच्या दमदार (61) अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत 7 बाद 157 धावा केल्या. या प्रत्युतरात भारतीय संघाने 158 धावांचे आव्हान 18.5 षटकांत 4 गडी गमावून 162 धावा करत पूर्ण केले.

ज्यामुळे भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध आपला टी-20 क्रिकेटमधील 100 वा सामना जिंकला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध 100 टी-20 आंतरराष्ट्रीय ( IND 100th win against WI T20 ) सामने जिंकणार भारत तिसरा देश ठरला आहे. या अगोदर इंग्लंड संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध सर्वाधिक 113 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. तसेच या यादीत ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध सर्वाधिक 141 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिकंले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.