बासेटेरे (सेंट किट्स): क्रिकेट वेस्ट इंडिजने (CWI) भारताविरुद्धचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना उशीरा संपल्याने तिसरा सामना दीड तास उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसरा T20 सामना ( WI vs Ind 3rd T20I ) स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता (भारतीय वेळेनुसार 8:00 वाजता) सुरू होणार होता, परंतु आता तो दीड तासांनंतर स्थानिक वेळेनुसार 12:00 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता) सुरू होईल.
क्रिकेट वेस्ट इंडिजने एका निवेदनात ( Statement from Cricket West Indies ) म्हटले आहे की, "सोमवारी सामना सुरू होण्यास उशीर झाल्यानंतर, दोन्ही संघांनी तिसरा टी-20 सामना उशीरा सुरु करण्यास सहमती दिली आहे, जेणेकरून खेळाडूंना सतत सामना खेळताना पुरेशी विश्रांती मिळू शकेल." हा निर्णय घेण्यापूर्वी फ्लोरिडातील सलग दोन सामन्यांचाही विचार करण्यात आला.
शेवटचे दोन सामने फ्लोरिडामध्ये होणार ( last two matches play in Florida ) असल्याचे क्रिकेट वेस्ट इंडिजच्या वक्तव्यावरूनही स्पष्ट झाले. काही अहवालांनुसार, अमेरिकेतील व्हिसाच्या समस्यांमुळे हे सामने दुसऱ्या ठिकाणी हलवले जाऊ शकतात. खेळाडूंचे सामान उशिरा पोहोचल्याने दुसरा टी-20 सामना दोन तास उशिरा सुरू झाला. वेस्ट इंडिजने हा सामना पाच गडी राखून जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
हेही वाचा - Chess Olympiad 2022 : तानिया सचदेवने भारतीय महिला संघाला मिळवून दिला विजय