मुंबई - शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यासाठी आज सोमवारी रवाना झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. यामुळे बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यावर दुसऱ्या फळीतील खेळाडू पाठवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, या दौऱ्यात भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आहे.
बीसीसीआयने भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणाऱ्या खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. तसेच काही खेळाडूंनी देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन फोटो पोस्ट केले आहेत. भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर पहिले काही दिवस क्वारंटाइन होईल. क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सरावाला परवानगी मिळणार आहे.
-
Off to 🇱🇰😍 pic.twitter.com/nTBazqTRGN
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) June 28, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Off to 🇱🇰😍 pic.twitter.com/nTBazqTRGN
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) June 28, 2021Off to 🇱🇰😍 pic.twitter.com/nTBazqTRGN
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) June 28, 2021
दरम्यान, भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. यादरम्यान, भारताचा दुसरा संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आले असून या संघात युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. चेतन सकारीया, देवदत्त पड्डीकल, नितिश राणा अशा बऱ्याच खेळाडूंचा हा पहिलाच दौरा आहे.
असा आहे भारताचा श्रीलंका दौरा
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेली सामने कोलंबोच्या आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
श्रीलंका दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ -
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन साकरिया.
हेही वाचा - बेन स्टोक्सने जुना हिशोब केला चुकता; ब्रेथवेटला चोपलं, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - ENGW vs INDW १st ODI: टॅमी-नतालीची तुफानी खेळी; इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव