नवी दिल्ली: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा थरार रविवारी संपुष्टात आला आहे. त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचे ( India v South Africa T20 Series ) वेध लागले आहे. या मालिकेला 12 जून पासून सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघ या मालिकेसाठी पाच जूनला एकत्र येणार आहे.
-
🔟days to go 🏏#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/jE6Rewcc9R
— Cricket South Africa (@OfficialCSA) May 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🔟days to go 🏏#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/jE6Rewcc9R
— Cricket South Africa (@OfficialCSA) May 31, 2022🔟days to go 🏏#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/jE6Rewcc9R
— Cricket South Africa (@OfficialCSA) May 31, 2022
भारताविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ 2 जूनला भारतात दाखल ( SA Arrive India on June 2 ) होणार आहे. या मालिकेसाठी प्रेक्षकांच्या प्रवेशावर कोणतेही बंधन नाही किंवा बायो बबल तयार केला जाणार नाही, तरी खेळाडूंची नियमित कोरोना तपासणी केली जाईल. दरम्यान मालिकेचे पाच सामने अनुक्रमे कटक (12जून), विशाखापट्टणम (14जून), राजकोट (17जून) आणि बंगळुरू (19जून) येथे होणार आहेत.
डीडीसीएचे संयुक्त सचिव राजन मनचंदा ( DDCA Joint Secretary Rajan Manchanda ) यांनी सांगितले की, भारतीय संघ 5 जूनला येथे जमणार आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ 2 जूनला पोहोचेल. दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू सध्या ब्रेकवर आहेत. या मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारताचे नेतृत्व करेल. या मालिकेत विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
हेही वाचा - IPL 2022 : आयपीएलच्या पंधरा हंगामातील चकीत करणारी पाच महत्वाची आकडेवारी