नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेचा संघ गुरुवारी सकाळी दिल्लीत पोहोचला ( Proteas Arrive in Delhi ). आयपीएलमध्ये सहभागी झालेले क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर आणि कागिसो रबाडा हे आधीच भारतात उपस्थित होते. ते आता भारताविरुद्ध होणाऱया टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघात सामील होणार आहेत. टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व करणार आहे.
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ( IND vs SA T20 series ) अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यात ट्रिस्टियन स्टब्सचाही समावेश आहे. स्टब्सचा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने त्यांच्या संघात बदली खेळाडू म्हणून समावेश केला होता. तथापि, स्टब्स आपल्या कामगिरीने फारसा छाप सोडू शकला नाही. दोन सामन्यांत त्याने अवघ्या दोन धावा केल्या. अशा परिस्थितीत आता त्याची नजर भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत अधिक चांगली कामगिरी करण्यावर असेल. त्याचवेळी एनरिक नॉर्टजेचेही संघात पुनरागमन झाले आहे. तो बऱ्याच दिवसांपासून दुखापतीशी झुंजत होता.
-
Touchdown 🇮🇳#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/kT67xxubwN
— Cricket South Africa (@OfficialCSA) June 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Touchdown 🇮🇳#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/kT67xxubwN
— Cricket South Africa (@OfficialCSA) June 2, 2022Touchdown 🇮🇳#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/kT67xxubwN
— Cricket South Africa (@OfficialCSA) June 2, 2022
भारत दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ( Arun Jaitley Stadium in Delhi ) खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ एक खास विक्रम आपल्या नावावर करू शकतो. भारतीय संघाने मागील 12 टी-20 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. टी-20 मध्ये सलग विजय मिळवत टीम इंडिया संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. यामध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तान आणि रोमानियाशी बरोबरी साधली होती.
भारतीय संघालाही विश्वविक्रम करण्याची संधी ( Opportunity for India set world record ) आहे. टीम इंडियाने मागील 12 टी-20 सामने जिंकले आहेत. जर भारताने पहिल्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, तर या संघाच्या नावावर सलग सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याचा विक्रम होईल. भारताने मायदेशात गेल्या तीन टी-20 मालिकेत विरोधी संघांना क्लीन स्वीप केला दिला आहे. भारताशिवाय अफगाणिस्तान आणि रोमानियानेही सलग 12 टी-20 सामने जिंकले आहेत.
-
South African cricket team arrives at Delhi airport ahead of India vs South Africa T20 series starting from 9th June. pic.twitter.com/Qf7uDkSmQV
— ANI (@ANI) June 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">South African cricket team arrives at Delhi airport ahead of India vs South Africa T20 series starting from 9th June. pic.twitter.com/Qf7uDkSmQV
— ANI (@ANI) June 2, 2022South African cricket team arrives at Delhi airport ahead of India vs South Africa T20 series starting from 9th June. pic.twitter.com/Qf7uDkSmQV
— ANI (@ANI) June 2, 2022
भारतीय संघालाही दक्षिण आफ्रिकेचा बदला घ्यायला आवडेल. या वर्षी जानेवारीमध्ये केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. आता टीम इंडियाला पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा क्लीन स्वीप देण्याची संधी आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचे वेळापत्रक -
पहिला टी-20 सामना : 9 जून, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
दुसरा टी-20 सामना : 12 जून, बाराबती स्टेडियम, कटक
तिसरा टी-20 सामना : 14 जून, वीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापटनम
चौथा टी-20 सामना : 17 जून, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट
पाचवा टी-20 सामना : 19 जून, एम.चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलळुरु
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे -
टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल , कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिझबा, कागिझम, टॅबर्स ट्रिस्टन स्टब्स, रॉसी व्हॅन डर डुसेन आणि मार्को जेन्सन.
हेही वाचा - Virender Sehwag Revealed : ... म्हणून मी 2008 साली वनडेतून निवृत्ती घेणार होतो - वीरेंद्र सेहवागचा खुलासा