बंगळुरु : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका ( IND vs SA T20 Series ) सुरु आहे. या मालिकेतील आतापर्यंत चार सामने पार पडले आहेत. त्यापैकी प्रत्येकी दोन सामने दोन्ही संघाने जिंकले आहेत. या मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना रविवारी (19 जून) खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघाचे दृष्टीने महत्वाचा आहे. कारण आज जो संघ सामना जिंकेल, तो संघ मालिका आपल्या नावे करेल.
-
Series decider 🏆
— Cricket South Africa (@OfficialCSA) June 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
⌚️15:30 CAT
🏟️M.Chinnaswamy Stadium, Bengaluru
🗒️ Ball by ball https://t.co/KNz7vLG39F
📺 SuperSport Grandstand 201
#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/gHbXDrM3oA
">Series decider 🏆
— Cricket South Africa (@OfficialCSA) June 19, 2022
⌚️15:30 CAT
🏟️M.Chinnaswamy Stadium, Bengaluru
🗒️ Ball by ball https://t.co/KNz7vLG39F
📺 SuperSport Grandstand 201
#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/gHbXDrM3oASeries decider 🏆
— Cricket South Africa (@OfficialCSA) June 19, 2022
⌚️15:30 CAT
🏟️M.Chinnaswamy Stadium, Bengaluru
🗒️ Ball by ball https://t.co/KNz7vLG39F
📺 SuperSport Grandstand 201
#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/gHbXDrM3oA
मालिकेतील पहिले दोन सामने दक्षिण आफ्रिका संघाने जिंकले होते. त्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत सलग दोन सामने जिंकत मालिकेत मुसंडी मारली. त्यामुळे मालिकेतील पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. जर रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखाली ( Captain Rishabh Pant ) भारतीय संघाने हा सामना जिंकला, तर 3-2 च्या फरकाने मालिकाही त्यांच्या नावे होईल. यासह पंत भारतभूमीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणारा पहिलावहिला कर्णधार बनेल.
कारण यापूर्वी कोणत्याही भारतीय कर्णधाराला मायभूमीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करता आलेले नाही. आतापर्यंत 2 वेळा दक्षिण आफ्रिका संघाने भारतात टी20 मालिका खेळली आहे. या मालिकांमध्ये एकदा धोनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करत होता, तर दुसऱ्यावेळी विराट कोहली ( Former captain Virat Kohli ) भारतीय संघाचा कर्णधार होता. या दोन्हीही मालिका भारतीय संघाला जिंकता आल्या नव्हत्या.
-
Series decider 🏆
— Cricket South Africa (@OfficialCSA) June 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
⌚️15:30 CAT
🏟️M.Chinnaswamy Stadium, Bengaluru
🗒️ Ball by ball https://t.co/KNz7vLG39F
📺 SuperSport Grandstand 201
#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/gHbXDrM3oA
">Series decider 🏆
— Cricket South Africa (@OfficialCSA) June 19, 2022
⌚️15:30 CAT
🏟️M.Chinnaswamy Stadium, Bengaluru
🗒️ Ball by ball https://t.co/KNz7vLG39F
📺 SuperSport Grandstand 201
#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/gHbXDrM3oASeries decider 🏆
— Cricket South Africa (@OfficialCSA) June 19, 2022
⌚️15:30 CAT
🏟️M.Chinnaswamy Stadium, Bengaluru
🗒️ Ball by ball https://t.co/KNz7vLG39F
📺 SuperSport Grandstand 201
#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/gHbXDrM3oA
वर्ष 2015 मध्ये झालेली टी20 मालिका दक्षिण आफ्रिकेने 2-0 ने जिंकली होती. या मालिकेतील 1 सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. तसेच 2019 मध्ये विराटच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने टी20 मालिका 1-1ने बरोबरीत राखली होती. या मालिकेतही एक सामना होऊ शकला नव्हता.
भारत : ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रुतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर, अव्वल कुमार, हर्षल पटेल, अरश पटेल, रवी बिश्नोई. सिंग आणि उमरान मलिक.
दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्किया, वेन पोर्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरीझ शमसी स्टब्स, रासी व्हॅन डर ड्यूसेन आणि मार्को यान्सेन.
हेही वाचा - Neeraj Chopra : ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने कुओर्तने गेम्समध्ये जिंकले सुवर्णपदक