विशाखापट्टणम: भारत आणि दक्षिण आफ्रिका ( India vs South Africa ) संघात सुरु असलेल्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. तसेच हे दोन्ही सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. त्याचबरोबर या मालिकेतील निर्णायक आणि तिसरा सामना आज (मंगळवारी) डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी दक्षिण आफ्रिका संघाने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( South Africa opt to bowl ) आहे.
-
Temba Bavuma calls it right at the toss and elects to bowl first in the 3rd T20I.
— BCCI (@BCCI) June 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/mcqjkC20Hg #INDvSA @Paytm pic.twitter.com/GjMOOGsa5T
">Temba Bavuma calls it right at the toss and elects to bowl first in the 3rd T20I.
— BCCI (@BCCI) June 14, 2022
Live - https://t.co/mcqjkC20Hg #INDvSA @Paytm pic.twitter.com/GjMOOGsa5TTemba Bavuma calls it right at the toss and elects to bowl first in the 3rd T20I.
— BCCI (@BCCI) June 14, 2022
Live - https://t.co/mcqjkC20Hg #INDvSA @Paytm pic.twitter.com/GjMOOGsa5T
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी, टी-20 क्रिकेटमध्ये एका संघाने सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम असलेल्या सलग 13 विजयांचा विक्रम करण्यासाठी भारताला दावेदार मानले जात होते. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नवी दिल्ली आणि कटकमध्ये सलग सामने गमावल्यानंतर भारतावर मालिका गमावण्याचा धोका आहे. त्यामुळे आज मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला विजय मिळवणे आवश्यक ( Indian team needs victory ) आहे. म्हणून आजचा सामना भारतीय संघासाठी करो या मरोचा आहे.
-
A look at the Playing XI for the 3rd #INDvSA T20I
— BCCI (@BCCI) June 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/mcqjkC20Hg @Paytm https://t.co/quiGdAuBWZ pic.twitter.com/JdYsukd2Iw
">A look at the Playing XI for the 3rd #INDvSA T20I
— BCCI (@BCCI) June 14, 2022
Live - https://t.co/mcqjkC20Hg @Paytm https://t.co/quiGdAuBWZ pic.twitter.com/JdYsukd2IwA look at the Playing XI for the 3rd #INDvSA T20I
— BCCI (@BCCI) June 14, 2022
Live - https://t.co/mcqjkC20Hg @Paytm https://t.co/quiGdAuBWZ pic.twitter.com/JdYsukd2Iw
भारत (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि आवेश खान.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, ड्वेन प्रिटोरियस, रॅसी व्हॅन डर डुसेन, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), डेव्हिड मिलर, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, तबरेझ शम्सी आणि अॅनरिक नॉर्टजे.
हेही वाचा - India Qualify for Asian Cup : भारतीय फुटबॉल संघ सलग दुसऱ्यांदा पोहोचला एएफसी आशियाई चषक स्पर्धेत