ETV Bharat / sports

IND vs PAK Asia Cup 2022 : पाकिस्तानचा भारतावर थरारक विजय; अखेरपर्यंत रंगला सामना - आशिया कप 2022 भारत पाकिस्तान सामना

IND vs PAK, Asia Cup 2022 : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेमधील ४ सप्टेंबरचा भारत-पाकिस्तान सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. शेवटच्या षटकापर्यंत दोन्ही संघांमध्ये विजयासाठी संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, हा सामना अखेर पाकिस्तानने पाच गडी राखून जिकंला (Pakistan beats India by 6 wickets).

ind vs pak asia cup
ind vs pak asia cup
author img

By

Published : Sep 5, 2022, 7:19 AM IST

IND vs PAK Asia Cup 2022 : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेमधील ४ सप्टेंबरचा भारत-पाकिस्तान सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. शेवटच्या षटकापर्यंत दोन्ही संघांमध्ये विजयासाठी संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, हा सामना अखेर पाकिस्तानने पाच गडी राखून जिकंला (Pakistan beats India by 6 wickets). भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाझ या जोडीने जोरदार फटकेबाजी केल्यामुळे पाकिस्तानला विजयापर्यंत पोहोचता आले.

भारताची कामगिरी - नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंत फलंदाजीसाठी आलेल्या भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळी केली. सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी मोठे फटके मारत अवघ्या २६ चेंडूंमध्ये भारतासाठी ५० धावा केल्या. मात्र दोघेही प्रत्येकी २८ धावा करून झेलबाद झाले. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या विराट कोहलीने शानदार कामगिरी केली. शेवटच्या षटकापर्यंत तो मैदानावर फलंदाजी करत होता. त्याने ४४ चेंडूंमध्ये चार चौकार आणि एक षटकार लगावत ६० धावा केल्या.

पाकिस्तानची कामगिरी - भारताने दिलेल्या १८२ धावांचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम सलामीला आले. मात्र, बाबर अवघ्या १४ धावा करून तंबूत परतला. रवी बिश्नोईने त्याचा बळी घेतला. दुसऱ्या विकेटसाठी आलेला फखर जमानही चांगली कामगिरी करू शकला नाही. १५ धावांवर खेळत असताना त्याला युझवेंद्र चहलने झेलबाद केले. त्यानंतर पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद नवाझ या जोडीने चोख भूमिका बजावली. रिझवानने ५१ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि सहा चौकार लगावत ७१ धावा केल्या. तर मोहम्मद रिझवानने २० चेंडूंमध्ये दोन चोकार, दोन षटकार लगावत ४२ धावा केल्या. तर खुशदील शाह (१४), असिफ अली (१६) या जोडीने संघाला विजयापर्यंत नेले.

अखेरच्या षटकात पाकिस्तानची भेदक गोलंदाजी - सातव्या क्रमांकावर आलेल्या दीपक हुडानं कोहलीसह 17.1 षटकांत संघाची धावसंख्या 150 वर नेली. दरम्यान, कोहलीनं हसनैनच्या चेंडूवर षटकार ठोकून या स्पर्धेतील आपलं दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. 19 व्या षटक टाकण्यासाठी आलेल्या नसीमने हुडाला (16) बाद करून भारताला 168 धावांवर सहावा धक्का दिला. अखेरच्या षटकात रौफनं चांगली गोलंदाजी केली. ज्यामुळं भारताला 20 षटकात सात विकेट्स गमावून 181 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानकडून शादाब खाननं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, हारिस रौफ आणि नवाजनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.