साउथम्पटन - जागतीक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम लढतीच्या पाचव्या दिवसाखेर भारताने न्यूझीलंडसमोर ३२ धावांची आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी मोहम्मद शमी आणि इशांत शर्माच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचा पहिला डाव ९९.२ षटकात २४९ धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद शमीच्या घातक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज जास्त काळ तग धरू शकले नाहीत. त्याने चार बळी घेतले तर दीडशेहून जास्त चेंडू खेळणाऱ्या केन विल्यमसनने ४९ धावा करत संघाला आघाडी मिळवून दिली. भारताने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली असून संघाने ३० षटकांत २ बाद ६४ अशी धावसंख्या उभारली आहे. बुधवारी (दि. २३ जून) राखीव दिवसाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेता कोण असणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला पहिल्या डावात २४९ धावांत रोखलं आहे. आज पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजावर वर्चस्व राखलं. मोहम्मद शमीने सर्वाधिक चार गडी बाद केले. तर इशांतने ३ गडी टिपले. भारतीय संघाचा पहिला डाव २१७ धावांत आटोपला होता. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी मिळाली आहे.
पाचव्या दिवशी देखील सामन्याला पावसामुळे उशिरा सुरूवात झाली. तेव्हा रॉस टेलर आणि केन विल्यमसन ही जोडी सावध खेळ करत होती. शमीने टेलरला बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. वैयक्तिक ११ धावांवर टेलरचा झेल हवेत सूर मारत शुबमनने टिपला. त्यानंतर हॅन्री निकोलसला (७) इशांतने रोहितकडे झेल देण्यास भाग पाडलं. दुसरीकडून शमीने बीजे वॉटलिंगच्या (१) दांड्या गुल करत न्यूझीलंडला जबर हादरा दिला. शमीने फेकलेला चेंडू वॉटलिंगला काही कळाच्या आत यष्ट्यावर जाऊन आदळला.
वॉटलिंग बाद झाल्यानंतर केन विल्यमसने कॉलिन डी ग्रँडहोमला साथीला घेत संघाची धावसंख्या दीडशेपार नेली. शमीने ग्रँडहोमला (१३) पायचित करत न्यूझीलंडला सहावा धक्का दिला. यानंतर आलेल्या काइल जेमिसनने फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. त्याची विकेट शमीने घेतली. उंच टोलावून मारण्याचा नादात उडालेला झेल सीमारेषेवर बुमराहने टिपला. जेमिसनने १६ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह २१ धावा केल्या.
दुसरी बाजू लावून धरलेल्या केन विल्यमसनला इशांतने विराट कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले. विल्यमसनचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याने ४९ धावांची चिवट खेळी केली. त्यानंतर वॅग्नरची (०) शिकार अश्विनने केली. त्याचा झेल रहाणेने घेतला. जडेजाने साउथीला क्लिन बोल्ड करत न्यूझीलंडचा डाव २४९ धावांवर संपुष्टात आणला. साउथीने ३० धावा केल्या. शमीने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर इशांतने तीन गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. अश्विनने २ तर जडेजाला १ विकेट मिळाली. जसप्रीत बुमराहच्या विकेटची पाटी रिकामी राहिली.
हेही वाचा - WTC Final: मोहम्मद शमी भरमैदानात टॉवेलमध्ये; चाहते म्हणाले, आता लुंगी डान्स होईल
हेही वाचा - WTC Final : शमीचा अफलातून चेंडू, अखेरचा कसोटी सामना खेळणाऱ्या वॉटलिंगच्या दांड्या गुल