ETV Bharat / sports

'इंग्लंडमध्ये फलंदाजी सोप्पी नाही, धावा करण्यासाठी ईगो पॉकेटमध्ये ठेऊन मैदानात उतरण्याची गरज' - भारताचा इंग्लंड दौरा 2021

इंग्लंड संघाला त्यांच्याच देशात पराभूत करण्यासाठी भारतीय संघ सक्षम असल्याची प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली.

ind vs eng : You need to keep ego in pocket while batting in England: Virat Kohli
'इंग्लंडमध्ये फलंदाजी सोप्पी नाही, धावा करण्यासाठी ईगो पॉकेटमध्ये ठेऊन मैदानात उतरण्याची गरज'
author img

By

Published : Aug 24, 2021, 9:48 PM IST

लीड्स - इंग्लंड संघाला त्यांच्याच देशात पराभूत करण्यासाठी भारतीय संघ सक्षम असल्याची प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली. तो हेडिंग्ले कसोटी सामन्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होता. इंग्लंडच्या कठीण वातावरणात फलंदाजी करताना तुम्हाला स्वत:चा ईगो खिशात ठेवण्याची गरज असल्याचे देखील विराटने सांगितलं.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्याची मालिका खेळवली जात आहे. भारतीय संघाने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन सामन्यात इंग्लंड संघात आघाडीचे खेळाडू बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स नव्हते. आता मार्क वूड दुखापतग्रस्त झाल्याचे समोर आले. यामुळे तो उद्या बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. या कारणाने इंग्लंडची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

याविषयावर विराट कोहली म्हणाला की, 'आम्ही विरोधी संघ कमकुवत होण्याची वाट पाहत नाही. तर आम्ही मागील काही वर्षांपासून चांगला खेळ केला आहे. हा प्रश्न याच संघाला विचारला जातो. आम्ही विरोधी संघाचा विचार करत नाही. असा दृष्टीकोन घेऊन आम्ही मालिका खेळण्यासाठी जात नाही.'

इंग्लंडच्या वातावरणात जिथे चेंडू सीम आणि स्विंग होतो अशा ठिकाणी फलंदाजी करण्याविषयी विराट कोहलीला विचारले तर यावर तो म्हणाला की, इंग्लंडमध्ये खेळताना मी सेट झालेलो आहे, असे तुम्ही कधीही सांगू शकत नाही. तुम्हाला तुमचा ईगो खिशात ठेवावा लागतो. येथील परिस्थिती दुसऱ्या ठिकाणासारखी नाही. इतर ठिकाणी 30-40 धावा केल्यानंतर तुम्ही मुक्तपणे फलंदाजी करू शकता, पण येथे असे होत नाही. तुम्ही 30 धावा करताना जशी काळजी घेतली होती. तशीच काळजी तुम्हाला कायम घ्यावी लागते. येथे तुम्हाला लयीने आणि संयमी फलंदाजी करावी लागते.

तुम्ही जर इंग्लंडमध्ये संयम ठेऊ शकत नसाल, तर तुम्ही कोणत्याही क्षणी बाद होऊ शकता. यात तुम्ही कितीही अनुभवी असा किंवा तुम्ही कितीही धावा केलेल्या असाल. तुम्हाला चांगले निर्णय घ्यावे लागतील कारण इंग्लंडमधील परिस्थिती जगातील सर्वात कठीण आहे, हे माझं वैयक्तिक ओपनियन आहे, असे देखील विराट म्हणाला.

दरम्यान, उद्या बुधवारपासून उभय संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. भारतीय संघ हा सामना जिंकत मालिकेतील आघाडी भक्कम करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ बरोबरी साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

हेही वाचा - कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही न्यूझीलंडचा फलंदाज 'कोरोना पॉझिटिव्ह'

हेही वाचा - IND vs ENG: जसप्रीत बुमराहवर जेम्स अँडरसनचा गंभीर आरोप, म्हणाला...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.