ETV Bharat / sports

IND vs ENG: जेम्स अँडरसनने सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला विश्वविक्रम - भारत वि. इंग्लंड चौथा कसोटी सामना

जेम्स अँडरसन त्याच्या कारकिर्दीतील 166वा कसोटी सामना खेळत आहे. त्याचा मायदेशातील हा 95वा सामना आहे. अँडरसनच्या आधी सचिन तेंडुलकरने मायदेशात (भारतात) सर्वाधिक 94 कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला होता.

IND vs ENG: James Anderson surpasses Sachin Tendulkar to play most Tests at home
IND vs ENG: जेम्स अँडरसन याने सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला विश्वविक्रम
author img

By

Published : Sep 2, 2021, 8:25 PM IST

ओवल - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावे अनेक विक्रमाची नोंद आहे. त्याने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात, मैदानात उतरताच आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. त्याने भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याला मागे टाकत मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला. लंडनच्या केनिंग्टन ओवल स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जेम्स अँडरसन त्याच्या कारकिर्दीतील 166 वा कसोटी सामना खेळत आहे. त्याचा मायदेशातील हा 95वा सामना आहे. अँडरसनच्या आधी सचिन तेंडुलकरने मायदेशात (भारतात) सर्वाधिक 94 कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला होता. या यादीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिग देखील आहे. त्याने ऑस्ट्रेलियात 92 कसोटी सामने खेळली.

इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलेस्टर कुक आणि स्टिव्ह वॉ यांनी आपापल्या देशात समान 89 कसोटी सामने खेळली आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार जॅक कॅलिसने त्याच्या देशात 88 कसोटी सामने खेळली.

इंग्लंड-भारत संघात बदल

भारत आणि इंग्लंड यांनी चौथ्या कसोटी सामन्यासाठी आपल्या संघात प्रत्येकी 2-2 बदल केले आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स आणि ओली पोपची संघात वापसी झाली आहे. तर सॅम कुरेन आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे भारताने मोहम्मद शमीच्या जागेवर शार्दुल ठाकूरला तर इशांत शर्माच्या जागेवर उमेश यादवला अंतिम संघात स्थान दिलं आहे. दरम्यान, उभय संघातील मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे.

हेही वाचा - Ind vs Eng : इंग्लंडने नाणेफेक जिंकली, भारताचा विजय पक्का?

हेही वाचा - IND vs ENG: काळ्या फिती लावून टीम इंडिया मैदानात, प्रशिक्षक वासुदेव परांजपेंना वाहिली श्रद्धांजली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.