ETV Bharat / sports

IND VS ENG : जेम्स अँडरसनबद्दल इंग्लंड मोठा निर्णय घेण्याची शक्यता - chris silverwood

विराट कोहली आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यातील द्वंद्व चौथ्या कसोटी सामन्यात पाहायला मिळेल, याची काही गँरंटी नाही. कारण यजमान संघ जेम्स अँडरसनला पुढील सामन्यात विश्रांती देण्याची शक्यता आहे.

IND VS ENG : james-anderson-may-be-rested-for-the-fourth-test
IND VS ENG : जेम्स अँडरसनबद्दल इंग्लंड मोठा निर्णय घेण्याची शक्यता
author img

By

Published : Aug 30, 2021, 8:57 PM IST

लंडन - आगामी चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहली आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळेल, याची काही गँरंटी नाही. कारण यजमान संघ जेम्स अँडरसनला पुढील सामन्यात विश्रांती देण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा संघ गोलंदाजांना रोटेट करणार आहे.

इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी जेम्स अँडरसन आणि ऑली रॉबिन्सन यांच्या वर्कलोडविषयी सांगितलं की, मी यांना ब्रेक देऊ इच्छित नाही. आमच्या पुढे खूप सामने आहेत. कसोटी क्रिकेट वेगवान होत आहे आणि यामुळे अडचणी वाढत आहेत.

दोन्ही खेळाडू चांगले योगदान देत आहेत. दिवसाचा खेळ संपल्यानंतर आम्ही यांच्यासाठी काही करू शकतो का याचा विचार आम्ही करतो. पण अद्याप आम्ही यांच्याविषयी काही निर्णय घेऊ शकलेलो नाही. जेम्स अँडरसन मालिकेतील प्रत्येक सामना खेळू इच्छित आहे. पण वर्कलोड मॅनेजमेंट पाहता इंग्लंड जेम्स अँडरसनला आराम देऊ शकतो, असे देखील ख्रिस सिल्वरवूड यांनी सांगितलं.

चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर ठेवण्यासाठी जेम्स अँडरसनची मनधारणी करणे कठिण होईल, असे देखील ख्रिस सिल्वरवुड म्हणाले. दरम्यान, जेम्स अँडरसन जरी चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर गेला तरी इंग्लंड संघासाठी खूप समस्येचा सामना करावा लागणार नाही. कारण इंग्लंडचे इतर गोलंदाज शानदार फॉर्मात आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्याची मालिका खेळवली जात आहे. उभय संघातील मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत होत आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले असून यात भारत आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. तर एक सामना पावसामुळे ड्रॉ झाला आहे. उभय संघात 2 सप्टेंबरपासून चौथ्या कसोटी सामन्याला सुरूवात होईल.

हेही वाचा - IND VS ENG: रविंद्र जडेजाला दुखापत, भारतीय संघाच्या अडचणीत वाढ

हेही वाचा - भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत मोठी अपडेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.