ETV Bharat / sports

Ind VS Eng : भारतीय संघात एकापेक्षा एक धुरंधर फलंदाज - मार्क वूड - इंग्लंड

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्याची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर असून उभय संघातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना 10 सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे. त्याआधी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याने भारतीय संघातील फलंदाजांचे कौतुक केले आहे.

Ind Vs Eng : India's batting is 'world class', need to be right on the money : Mark  Wood
Ind VS Eng : भारतीय संघात एकापेक्षा एक धुरंधर फलंदाज - मार्क वूड
author img

By

Published : Sep 8, 2021, 7:24 PM IST

Updated : Sep 8, 2021, 7:47 PM IST

मँचेस्टर - भारताकडे जागतिक दर्जाचे फलंदाज असून त्यांच्यापुढे गोलंदाजांना अचूक गोलंदाजी करावी लागेल, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याने दिली आहे. मार्क वूड पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला सुरूवात होण्याआधी झालेल्या व्हर्चुअल पत्रकार परिषदेत बोलत होता.

मार्क वूड म्हणाला, भारताकडे जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत. तुम्ही जर भारताचा फलंदाजी क्रम पाहिला तर यात तुम्हाला सर्व खेळाडू एका पेक्षा एक चांगले पाहायला मिळतील. रोहित शर्मा एक सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये गोलंदाजी करणे कठीण ठरते.

के एल राहुलने मला खूप प्रभावित केलं. तो चांगले चेंडू सोडतो. क्रीझवर तळ ठोकून त्याने खरेचं चांगली फलंदाजी केली. सलामीवीरची विकेट आमच्यासाठी दोन मोठ्या विकेट आहेत. यानंतर तुमच्यासमोर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली असतात. क्रिकेटच्या सर्व प्रकारात मी ज्या फलंदाजांना गोलंदाजी केली. यात विराट कोहलीला बाद करणे सर्वात कठीण राहिलं आहे. सांगायचे झाल्यास त्यांच्याकडे जागतिक दर्जाचे एकापेक्षा एक चांगले फलंदाज आहे. तुम्हाला जर यांना बाद करण्यासाठी स्वत:वर विश्वास नसेल तर खेळण्याचा काही फायदा नाही, असे देखील मार्क वूड म्हणाला.

आमच्याकडे फलंदाजाला रोखण्यासाठी रणणिती असते. काही वेळा ही रणणिती फायदेशीर ठरते. पण काही वेळा याचा फायदा होत नाही. पण जेव्हा तुमच्या समोर चांगले फलंदाज असतो. तुम्हाला अचून गोलंदाजी करावी लागेल अन्यथा ते तुमचा योग्य समाचार घेऊ शकतात, असे देखील मार्क वूडने सांगितलं.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्याची मालिका खेळवली जात आहे. भारतीय संघाने या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. उभय संघातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला 10 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.

हेही वाचा - ओवलचा ऐतिहासिक विजय: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूरला ICC कडून खास गिफ्ट

हेही वाचा - भारत-इंग्लंड यांच्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक आलं समोर

Last Updated : Sep 8, 2021, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.