बर्मिंघम: एजबॅस्टन येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात पाचवा कसोटी ( IND vs ENG 5th Test ) सामना पार पडला. या सामन्यत यजमान इंग्लंड संघाने भारतावर 7 गडी राखून मात ( England won by 7 wickets ) केली. त्याचबरोबर त्यांनी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-2अशी बरोबरी साधली. टीम इंडियाने यजमानांसमोर विजयासाठी 378 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, मात्र जो रूट आणि जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow ) यांनी शतकी खेळी करत हे लक्ष्य 76.4 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले.
-
This team. This way of playing. Simply irresistible ❤️
— England Cricket (@englandcricket) July 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard/Clips: https://t.co/jKoipF4U01
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/Phl1BNkGol
">This team. This way of playing. Simply irresistible ❤️
— England Cricket (@englandcricket) July 5, 2022
Scorecard/Clips: https://t.co/jKoipF4U01
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/Phl1BNkGolThis team. This way of playing. Simply irresistible ❤️
— England Cricket (@englandcricket) July 5, 2022
Scorecard/Clips: https://t.co/jKoipF4U01
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/Phl1BNkGol
रिषभ पंत-रविंद्र जडेजाच्या खेळी व्यर्थ -
जो रूटने 142 ( Joe root 142 Runs ) आणि जॉनी बेअरस्टोने नाबाद 114 धावा केल्या. इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्षाचा यशस्वीपणे पाठलाग केला. स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या शतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांवर आटोपला. 132 धावांच्या आघाडीसह भारताने दुसऱ्या डावात 284 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 378 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
-
5TH Test. England Won by 7 Wicket(s) https://t.co/LL20D1K7si #ENGvIND
— BCCI (@BCCI) July 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">5TH Test. England Won by 7 Wicket(s) https://t.co/LL20D1K7si #ENGvIND
— BCCI (@BCCI) July 5, 20225TH Test. England Won by 7 Wicket(s) https://t.co/LL20D1K7si #ENGvIND
— BCCI (@BCCI) July 5, 2022
बेयरस्टो-रूट जोडीची शतकी खेळी -
भारताकडून मिळालेल्या 378 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर ऍलेक्स लीस आणि झॅक क्राउले यांनी शतकी भागीदारी करत संघासाठी विजय सोपा बनवला होता. लीसने 65 चेंडूत 56 तर क्राउलेने 76 चंडूत 46 धावांची खेळी केली होती. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी झाली होती. त्यानंतर जॉनी बेयरस्टो आणि जो रूट यांनी संघाचा मोर्चा सांभाळला. चौथ्या दिवशी खिंड लढवल्यानंतर पाचव्या दिवशी पहिल्या सेशनपर्यंतच त्यांनी संघाला विजय मिळवून दिला. रूट 173 चेंडूत 1 षटकार आणि 19 चौकारांच्या मदतीने 142 धावांवर नाबाद राहिला. तसेच बेयरस्टोने 145 चेंडूंचा सामना करताना नाबाद 114 धावा केल्या.