बर्मिंगहॅम: जॉनी बेअरस्टो ( Johnny Bairstow ) आणि जो रूट यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या ( IND vs ENG 5th Test ) चौथ्या दिवशी सोमवारी इंग्लंड संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला. विजयासाठी 378 धावांच्या कठीण लक्ष्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडने दुसऱ्या डावात 3 बाद 259 अशी आक्रमक सुरुवात केली. त्यांना आता मालिकेत बरोबरी साधण्यासाठी 119 धावांची ( England need 119 runs ) गरज आहे. रूट 112 चेंडूत 76 तर बेअरस्टोने 87 चेंडूत 72 धावांवर खेळत आहेत. दोघांनी 197 चेंडूत 150 धावांची भागीदारी केली आहे.
-
That's Stumps on Day 4 of the Edgbaston Test!
— BCCI (@BCCI) July 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
England move to 259/3 before the close of play.
See you tomorrow for Day 5 action.
Scorecard ▶️ https://t.co/xOyMtKrYxM #TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/N48XjJFZF8
">That's Stumps on Day 4 of the Edgbaston Test!
— BCCI (@BCCI) July 4, 2022
England move to 259/3 before the close of play.
See you tomorrow for Day 5 action.
Scorecard ▶️ https://t.co/xOyMtKrYxM #TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/N48XjJFZF8That's Stumps on Day 4 of the Edgbaston Test!
— BCCI (@BCCI) July 4, 2022
England move to 259/3 before the close of play.
See you tomorrow for Day 5 action.
Scorecard ▶️ https://t.co/xOyMtKrYxM #TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/N48XjJFZF8
इंग्लंडची धावसंख्या एकवेळेस बिनबाद 107 अशी होती, परंतु भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने ( Captain Jaspreet Bumrah ) अॅलेक्स लीस आणि जॅक क्रॉलीच्या विकेट्स घेत धावसंख्या तीन बाद 109 अशी कमी केली. लीस 65 चेंडूत 56 धावा करून बाद झाला आणि क्रॉलीने 76 चेंडूत 46 धावा केल्या. हनुमा विहारीने 14 धावांवर बेअरस्टोला जीवदान दिले, जे भारताला महागात पडले. बेन स्टोक्स आणि सॅम बिलिंग्स हे देखील इंग्लंडकडून फलंदाजीसाठी अद्याप मैदानात उतरलेले नाहीत. अशा स्थितीत भारताला विजयासाठी काही चमत्काराची अपेक्षा करावी लागेल.
दुसऱ्या सत्राच्या अखेरीस जसप्रीत बुमराहने जॅक क्रॉलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यानंतर भारताला पहिले यश मिळाले. लीस धावबाद झाला तर ओली पोप विकेटच्या मागे झेलबाद झाला. यानंतर बेअरस्टो आणि रूट ( Joe Root ) यांनी संघाचा मोर्चा सांभाळला. तत्पूर्वी, दुस-या डावात उपाहारानंतर भारतीय संघ 8.5 षटकांत 245 धावांत आटोपला होता. ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने उपाहारापर्यंत 361 धावांची आघाडी घेतली होती.
-
First ball after Tea and Jasprit Bumrah gets the wicket of Ollie Pope who departs for a duck.
— BCCI (@BCCI) July 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/xOyMtKJzWm #ENGvIND pic.twitter.com/VyfYe5azfw
">First ball after Tea and Jasprit Bumrah gets the wicket of Ollie Pope who departs for a duck.
— BCCI (@BCCI) July 4, 2022
Live - https://t.co/xOyMtKJzWm #ENGvIND pic.twitter.com/VyfYe5azfwFirst ball after Tea and Jasprit Bumrah gets the wicket of Ollie Pope who departs for a duck.
— BCCI (@BCCI) July 4, 2022
Live - https://t.co/xOyMtKJzWm #ENGvIND pic.twitter.com/VyfYe5azfw
पहिल्या डावात आक्रमक शतक झळकावणाऱ्या पंतने सावध खेळ केला. खेळ सुरू झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ( England captain Ben Stokes ) अनियमित गोलंदाज जो रूटला तीन षटके दिली, त्यामुळे पंत आणि पुजाराचे काम सोपे झाले. पुजाराने स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर खराब शॉट खेळला आणि बॅकवर्ड पॉइंटवर तो झेलबाद झाल. काही चांगले फटके खेळून श्रेयस अय्यर पुन्हा स्वस्तात बाद झाला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याच्यासाठी शॉर्ट पिच बॉल्सचे जाळे टाकले होते ज्यात तो अडकला.
-
A mix up in the middle and Alex Lees is Run Out.
— BCCI (@BCCI) July 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/xOyMtKJzWm #ENGvIND pic.twitter.com/G6piVTWjKC
">A mix up in the middle and Alex Lees is Run Out.
— BCCI (@BCCI) July 4, 2022
Live - https://t.co/xOyMtKJzWm #ENGvIND pic.twitter.com/G6piVTWjKCA mix up in the middle and Alex Lees is Run Out.
— BCCI (@BCCI) July 4, 2022
Live - https://t.co/xOyMtKJzWm #ENGvIND pic.twitter.com/G6piVTWjKC
यादरम्यान पंतने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि परदेशी भूमीवर कसोटीत शतक आणि अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला. जॅक लीचला चौकार मारल्यानंतर पंतने पुढच्या षटकात रिव्हर्स पूल खेळला पण पहिल्या स्लिपमध्ये तो रूटने त्याचा झेल घेतला. तळातील फलंदाजांचे कोणतेही योगदान लाभले नाही.
हेही वाचा - Ind Vs Eng 5th Test 4th Day : ऋषभ पंतने मोडला 72 वर्षांपूर्वीचा विक्रम; इंग्लंडला 378 धावांचे लक्ष्य