ETV Bharat / sports

Ind vs Eng : लंचपर्यंत भारताच्या 3 बाद 54 धावा, विराट-जडेजाची जोडी मैदानात - ओली रॉबिन्सन

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय संघाने उपहारापर्यंत 3 बाद 54 धावा केल्या आहेत.

ind-vs-eng-4th-test-till-lunch-team-india-score-was-54-runs-for-the-loss-of-three-wickets
Ind vs Eng : लंचपर्यंत भारताच्या 3 बाद 54 धावा, विराट-जडेजाची जोडी मैदानात
author img

By

Published : Sep 2, 2021, 6:51 PM IST

ओवल - भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना ओवलच्या मैदानात रंगला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय संघाने उपहारापर्यंत 3 बाद 54 धावा केल्या आहेत.

नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. तेव्हा भारताची सुरूवात निराशजनक राहिली. रोहित शर्मा अवघ्या 11 धावा काढून बाद झाला. त्याला ख्रिस वोक्सने जॉनी बेयरस्टोकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर केएल राहुल पायचित करत ओली रॉबिन्सनने भारताला दुसरा धक्का दिला. राहुलने 44 चेंडूत तीन चौकारासह 17 धावांची खेळी केली.

भारतीय संघ या दोन धक्क्यातून सावरत असताना जेम्स अँडरसनने भारताला आणखी एक धक्का दिला. त्याने अनुभवी चेतेश्वर पुजाराला (4) जॉनी बेयरस्टो करवी झेलबाद केले. त्यामुळे भारताची अवस्था 3 बाद 39 अशी झाली. तेव्हा विराट कोहलीने रविंद्र जडेजासोबत जोडी जमवली. जडेजाला वरच्या फळीत फलंदाजी करण्याची संधी मिळाली. उपहारापर्यंत भारताने 3 बाद 54 धावा केल्या आहेत. विराट कोहली 18 तर जडेजा 2 धावांवर नाबाद आहे. ख्रिस वोक्स, ओली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

हेही वाचा - विराट कोहलीची क्रमवारीत सहाव्या स्थानावर घसरण, कशी ठरते रॅकिंग?, जाणून घ्या

हेही वाचा - Ind vs Eng : विराट कोहलीला बाद करण्याविषयी जेम्स अँडरसन म्हणाला, मी त्याला दाखवू इच्छितो...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.