ETV Bharat / sports

Ind vs Eng : इंग्लंडने नाणेफेक जिंकली, भारताचा विजय पक्का? - मोहम्मद शमी

भारताविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ind-vs-eng-4th-test-england-won-the-toss-and-decided-to-bowl
Ind vs Eng : इंग्लंडने नाणेफेक जिंकली, भारताचा विजय पक्का?
author img

By

Published : Sep 2, 2021, 4:24 PM IST

ओवल - भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली आहे. ओवलच्या मैदानात सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, उभय संघातील मालिका सद्यघडीला 1-1 अशा बरोबरीत आहे.

नाणेफेक जिंकणारा संघ झालाय पराभूत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्याच्या मालिकेत नाणेफेक जिंकणारा संघ पराभूत झालेला पाहायला मिळत आहे. लॉर्डस् कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. पण हा सामना भारताने 151 धावांनी जिंकला. हेडिंग्ले कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. या सामन्यात इंग्लंडने भारताचा एक डाव आणि 76 धावांनी पराभव केला. आता चौथ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकली आहे. आता या सामन्याचा निकाल काय लागतो, हे पाहावं लागेल.

इंग्लंड-भारत संघात बदल

भारत आणि इंग्लंड यांनी चौथ्या कसोटी सामन्यासाठी आपल्या संघात प्रत्येकी 2-2 बदल केले आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स आणि ओली पोपची संघात वापसी झाली आहे. तर सॅम कुरेन आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे भारताने मोहम्मद शमीच्या जागेवर शार्दुल ठाकूरला तर इशांत शर्माच्या जागेवर उमेश यादवला अंतिम संघात स्थान दिलं आहे.

  • भारतीय संघ -

केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

  • इंग्लंडचा संघ -

रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेविड मलान, जो रूट (कर्णधार), ओली पोप, जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, क्रेग ओवरटन, ओली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन.

हेही वाचा - ENG vs IND: भारत-इंग्लंड कसोटी मालिकेबाबत प्रशिक्षक रवी शास्त्रींची मोठी प्रतिक्रिया

हेही वाचा - विराट कोहलीची क्रमवारीत सहाव्या स्थानावर घसरण, कशी ठरते रॅकिंग?, जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.