लीड्स - भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, उभय संघात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. भारतीय संघ या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवली जात आहे.
भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपला विजयी संघ कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे इंग्लंड संघाने दोन बदल केले आहेत. त्यांचे डोम सिब्ली आणि मार्क वूड हा सामना खेळत नाहीयेत. त्यांच्या जागेवर डेविड मलान आणि क्रेग ओवरटन यांना अंतिम संघात संधी मिळाली आहे. हसीब हमीद सलामीला येऊ शकतो.
दरम्यान, तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाच्या जागेवर रविचंद्रन अश्विनला अंतिम संघात स्थान मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु विराट कोहली आणि व्यवस्थापनाने विजयी संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय प्लेईंग इलेव्हन -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि के. एल. राहुल.
इंग्लंड प्लेईंग इलेव्हन -
जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, हसीब हमीद, डेव्हिड मलान, क्रेग ओवरटन आणि ऑली रॉबिन्सन.
हेही वाचा - 'इंग्लंडमध्ये फलंदाजी सोप्पी नाही, धावा करण्यासाठी ईगो पॉकेटमध्ये ठेऊन मैदानात उतरण्याची गरज'
हेही वाचा - Eng vs Ind: जो रुटला साथ द्या, जोस बटलरचे संघातील फलंदाजांना आवाहन