ETV Bharat / sports

IND vs ENG 3rd T20 : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; भारतीय संघात चार, तर इंग्लंड संघात दोन बदल - क्रिकेटच्या न्यूज

भारत आणि इंग्लंड संघात तिसरा टी-20 सामना ( IND vs ENG 3rd T20 ) नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ( England opt to bat ) घेतला आहे.

IND vs ENG
IND vs ENG
author img

By

Published : Jul 10, 2022, 6:47 PM IST

नॉटिंघम: सध्या भारत आणि इंग्लंड ( IND vs ENG ) संघात कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील अंतिम आणि तिसरा टी-20 सामना रविवारी (10 जुलै) खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी रोहित शर्मा आणि जोस बटलर या दोन कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ( England opt to bat ) घेतला आहे.

आजच्या तिसऱ्या सामन्यांसाठी भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत, त्याचबरोबर इंग्लंड संघात देखील दोन बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघात आवेश खान, उमरान मलिक रवि बिश्नोई आणि श्रेयस अय्यर यांना संधी देण्यात आली आहे. इंग्लंड संघात रीस टॉप्ली आणि फिल सॉल्ट यांना संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघ या मालिकेतील पहिला सामना 50 धावांनी आणि दुसरा सामना 49 धावांनी जिंकून 2-0 ने विजयी आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यात जडेजा आणि भुवनेश्वर कुमारने विजय खेचून आणला. त्याचप्रमाणे आजचा ही सामना जिंकून इंग्लंडला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्नात भारतीय संघ असणार आहे. दुसरीकडे जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ या मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी झगडताना दिसेल.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार,यष्टीरक्षक), डेविड मलान, फिलिप सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, मोईन अली, डेव्हिड विली, ख्रिस जॉर्डन, रीस टॉप्ली आणि रिचर्ड ग्लीसन.

  • Let's go have some fun in Nottingham 💪

    Jos wins the toss and we will bat first!

    We make two changes to our XI.

    🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 #ENGvIND

    — England Cricket (@englandcricket) July 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, आवेश खान, उमरान मलिक, रवी बिश्नोई.

हेही वाचा -World Games 2022 : भारताच्या अभिषेक-ज्योती मिश्र संघाने तिरंदाजीमध्ये पटकावले कांस्यपदक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.