ETV Bharat / sports

SAvsIND 3rd ODI: 40.1 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 6 बाद 228 : क्विंटन डी कॉकची शतकी खेळी

author img

By

Published : Jan 23, 2022, 5:26 PM IST

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India v South Africa) संघात तिसरा वनडे सामना सुरु आहे. 40.1 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 6 बाद 228 अशी आहे.

SAvsIND
SAvsIND

केपटाऊन: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI series between INDvSA)तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळला जात आहे. हा सामना न्यूलॅंडस येथील केपटाऊन येथे खेळला जात आहे. या सामन्यांची नाणेफेक भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने जिंकली आहे. त्यामुळे भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.

तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या ताफ्यात दोन बदले (Two changes to the SA squad) केले आहेत. तब्ररीज शम्सी आणि मार्को यान्सिन या दोघांच्या जागेवर कगिसो रबाडा आणि ड्विनी प्रिटोरीस यांनी संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर भारतीय संघात देखील चार बदल (Four changes to the India squad) करण्यात आले आहेत. सुर्यकुमार यादव, जयंत यादव, दीपक चहर आणि प्रसिद्ध कृष्णा या चौघांना आर. आश्विन, भुवनेश्वर कुमार, व्येंकटेश अय्यर आणि शार्दुल ठाकुर यांच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. हे बद्दल मागील दोन सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेकडून क्लीन स्वीप टाळण्यासाठी हे बद्दल करण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिका संघाच्या डावाची सुरुवात क्विंटन डी कॉक आणि जनेमन मलान यांनी केली. मात्र सामन्याच्या तिसऱ्या षटकात दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का बसला. जनेमन मलान एक धावेववर दीपक चहरने बाद केले. त्यानंतर दुसरा धक्का सातव्या षटकात टेंबा बावुमाच्या रुपाने बसला. तो 8 धावांवर धावचित झाला. तसेच दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का एडेम मार्करमच्या रुपाने बसला. त्याला दीपक चहरने 15 धावांवर बाद केले. अशा पद्धतीने एका बाजूने पडझड सुरु असताना क्विंटन डी कॉकने मात्र एक बाजू लावून धरली. त्याने रसी वॅन डूसेन याच्या साथीने चौथ्या गड्यासाठी 144 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली आहे. तसेच आपल्या संघाची पडझड देखील रोखली.

त्यानंतर मात्र क्विंटन डी कॉक 124 धावांवर (Quinton de Kock century) बाद झाला. त्याचा झेल शिखर धवनने जसप्रीत बुमराहानच्या गोलंदाजीवर घेतला. क्विंटन डी कॉकने 130 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकार खेचत 124 धावांची शानदार खेळा केली. त्याच्यानंतर लगेच रसी वॅन डूसेन हा देखील 59 चेंडूत 52 धावा काढून बाद झाला. त्याला युजवेंद्र चहलने बाद केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने 40.1 षटकांत 6 बाद 228 धावा केल्या आहेत. सध्या डेविड मिलर 7 धावांवर खेळत आहे. एन्डीली फेलकाव्यू 4 धावांवर धावबाद झाला आहे.

तसेच भारताकडून दीपक चहरने 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर बुमराहा आणि चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. तसेच दोन फलंदाज धावबाद झाले आहेत.

हेही वाचा: IPL 2022 Mega Auction: शिखर धवन 2 कोटी, श्रीशांत 50 लाख तर लिलावात कोणत्या खेळाडूची आधारभूत किंमत किती? घ्या जाणून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.