ETV Bharat / sports

IND vs IRE : जेव्हा कोणताच पर्याय उपलब्ध नसतो, तेव्हा योद्धा व्हावे लागते - दीपक हुड्डा

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा दीपक हुड्डा ( Deepak Hooda ) सर्वात लहान फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला.

Deepak Hooda
Deepak Hooda
author img

By

Published : Jun 29, 2022, 4:30 PM IST

Updated : Jun 29, 2022, 7:07 PM IST

मलाहाइड (आयरलैंड): भारताचा आक्रमक फलंदाज दीपक हुड्डा याने मंगळवारी आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याने 57 चेंडूत 104 धावांची तुफानी खेळी खेळली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा हुड्डा हा खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये शतक करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला. सामन्यानंतर दीपक हुड्डाने प्रतिक्रिया ( Deepak Hooda statement ) दिली.

नव्या चेंडूचा सामना करण्याची जबाबदारी मिळाली -

दीपक हुड्डा म्हणाला ( Deepak Hooda comments after India win ) की, जेव्हा गोलंदाजाना अनुकूल परिस्थिती असताना नवीन चेंडूचा सामना करण्याची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली तेव्हा त्याने 'योद्धा' सारखी वृत्ती घेतली. हुडाच्या म्हणण्यानुसार, त्याच्याकडे क्रमवारीत अव्वल फलंदाजी करण्याचे आव्हान पेलण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. सामन्यानंतर हुड्डा म्हणाला, 'मी कधीही आंतरराष्ट्रीय सामन्यात डावाची सलामी दिली नाही, पण एक अव्वल फळीतील फलंदाज असल्याने तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागले. कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.'

आक्रमक होऊन गोष्टी माझ्या बाजूने घडल्या, मी आनंदी आहे-

दीपक म्हणाला, 'आणि जर तुमच्याकडे पर्याय नसेल तर तुम्ही योद्धासारखी वृत्ती का घेत नाही. मी असाच विचार करतो आणि गोष्टी माझ्या बाजूने गेल्या. याचा मला आनंद आहे. युवा खेळाडू सातत्याने समोर येत असून भारतीय संघात स्थान मिळवणे आणि नंतर ते कायम ठेवणे सोपे नाही, अशी कबुली या अष्टपैलू खेळाडूने दिली.

.. भारतीय संघात राहणे कठीण आहे -

हुड्डा म्हणाला, 'खरं सांगायचं तर हो भारतीय संघात स्थान मिळवणं आणि नंतर ते टिकवणे खुप अवघड आहे. पण जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा तुम्ही कधीच स्वतःचा विचार करत नाही, त्यावेळी तुम्ही संघाचा विचार करता. तिसऱ्या षटकात सलामीवीर इशान किशन बाद झाल्यानंतर क्रीझवर आलेल्या हुड्डाने 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने आपले पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. दीपक म्हणाला, "प्रामाणिकपणे सांगायचे तर, आयर्लंड संघ आमच्याविरुद्ध खरोखरच चांगला खेळला आणि आम्हाला त्यांच्याविरुद्ध खेळताना खूप आनंद झाला.

हुड्डा म्हणाला, 'पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यादरम्यान मला वाटतं की खेळपट्टीत फरक होता. पहिल्या सामन्यात आकाश ढगाळ होते आणि विकेटमध्ये ओलावा होता. पण दुसऱ्या सामन्यात फलंदाजीसाठी विकेट खूपच चांगली होती, हे दोन्ही संघांच्या फलंदाजीवरून दिसून येते.

कर्णधार हार्दिक पंड्याचे उघडपणे कौतुक केले -

दोन सामन्यांच्या मालिकेत संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्याचेही हुड्डा यांनी कौतुक केले. तो म्हणाला, 'अर्थात हार्दिक खूप चांगले नेतृत्व करत आहे. आयपीएलमध्ये त्याने नवीन फ्रँचायझीचे नेतृत्व केले आणि त्याने विजेतेपद पटकावले. त्याच्यासाठी आणि तो ज्या प्रकारे जबाबदारी घेत आहे, त्यासाठी मी खूप आनंदी आहे. मला त्याचा अभिमान आहे, तो खूप चांगली कामगिरी करत आहे.

भारतीय डावात हुडाने संजू सॅमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 176 धावांची विक्रमी भागीदारी केली. सॅमसन संघात परतला आणि त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम 77 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये भारताची कोणत्याही विकेटची ही सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वीचा विक्रम रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या नावावर होता, ज्यांनी 2017 मध्ये इंदूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध 165 धावा जोडल्या होत्या.

हेही वाचा - Wimbledon 2022 : सेरेना विल्यम्सला मोठा धक्का, पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर

Last Updated : Jun 29, 2022, 7:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.