ETV Bharat / sports

रडवेल्या भारतीय संघाला मोदींनी घेतलं कवेत; वर्ल्डकप पराभवानंतर ड्रेसिंगरुममध्ये पोहोचले मोदी, शमीची भावनिक पोस्ट - Ind Vs Aus

Ind Vs Aus Final : विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव १४० कोटी देशवासीयांना पचवता आलेला नाही. या वेदनादायक पराभवानंतर स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज मोहम्मद शमीनं एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Mohammed Shami emotional post
Mohammed Shami emotional post
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 5:36 PM IST

Updated : Nov 21, 2023, 3:12 PM IST

रडवेल्या भारतीय संघाला मोदींचा दिलासा

अहमदाबाद Ind Vs Aus Final : क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं विक्रमी सहाव्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (१९ नोव्हेंबर) झालेल्या या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवानं १४० कोटी देशवासीयांचं स्वप्न भंगलं. सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडू भावूक होऊन पॅव्हेलियनमध्ये परतताना दिसले. कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्या डोळ्यात अश्रू होते. तर इतर खेळाडूंच्या चेहऱ्यावरही निराशा स्पष्ट दिसत होती.

  • Unfortunately yesterday was not our day. I would like to thank all Indians for supporting our team and me throughout the tournament. Thankful to PM @narendramodi for specially coming to the dressing room and raising our spirits. We will bounce back! pic.twitter.com/Aev27mzni5

    — 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) November 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोदी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये पोहचले : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आले होते. सामना संपल्यानंतर त्यांनी विश्वविजेता ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सकडे ट्रॉफी सुपूर्द केली. यानंतर मोदी ड्रेसिंग रुममध्ये भारतीय खेळाडूंना भेटण्यासाठी पोहचले. खेळाडूंची भेट घेऊन मोदींनी त्यांना प्रोत्साहन दिलं. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि या विश्वचषकात सर्वाधिक २४ विकेट घेणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यानं ड्रेसिंग रुममधला पंतप्रधान मोदींनी मिठी मारल्याचा फोटो शेअर केला. यासह शमीनं हृदयस्पर्शी करणारी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

शमीची सोशल मीडिया पोस्ट : शमीनं लिहिलं की, "दुर्दैवानं, कालचा दिवस आमचा नव्हता. संपूर्ण स्पर्धेत आमच्या संघाला आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आभार मानू इच्छितो. (मी) पंतप्रधान (मोदी) यांचे ड्रेसिंग रूममध्ये येऊन आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल कृतज्ञ आहे. आम्ही पुन्हा कमबॅक करू!" असं शमी म्हणाला.

  • In this World Cup 2023:

    Most wickets - Shami.
    Best Average - Shami.
    Best Bowling - Shami.
    Most 5-fers - Shami.
    Most 4-fers - Shami.
    Best Strike rate - Shami.

    - This performance of Mohammed Shami in this World Cup will be remembered forever - Take a bow, Shami. pic.twitter.com/Aj4qamOF3s

    — CricketMAN2 (@ImTanujSingh) November 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विश्वचषकात दमदार कामगिरी : वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं भारताला या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पहिल्या ४ सामन्यांमध्ये प्लेइंग ११ मधून बाहेर असूनही, शमीनं नंतरच्या ७ सामन्यात सर्वाधिक २४ विकेट घेतल्या. शमीनं न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात ७ विकेट घेतल्या होत्या.

हेही वाचा :

  1. करोडो भारतीयांचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा जगज्जेता; टीम इंडियाचा दारूण पराभव
  2. अंतिम सामन्यातील पराभवानंतर पंतप्रधान मोदी, सेलिब्रिटींसह माजी खेळाडूंनी वाढवलं भारतीय संघाचं मनोबल, वाचा कोण काय म्हणाले?
  3. Mitchell Marsh News: विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाचा उद्धटपणा समोर, क्रिकेटप्रेमी संतप्त

Last Updated : Nov 21, 2023, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.