ETV Bharat / sports

Ind Vs Pak : घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाची विजयादशमी, नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानला लोळवलं

Ind Vs Pak : विश्वचषकात खेळल्या गेलेल्या आजच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय मिळवला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मानं धुवांधार फलंदाजी करत ६३ चेंडूत ८६ धावा ठोकल्या.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 8:08 PM IST

Updated : Oct 14, 2023, 8:23 PM IST

अहमदाबाद Ind Vs Pak : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ७ गडी राखून दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारतानं पाकिस्तानला विजयाची कुठलीही संधी दिली नाही.

  • #WATCH | ICC World Cup | Half-centuries by Rohit Sharma and Shreyas Iyer help India beat Pakistan by 7 wickets to register their third consecutive win in the tournament.

    Visuals of celebrations and bursting of firecrackers from Ahmedabad in Gujarat. #INDvsPAK pic.twitter.com/ynA7r7FVMd

    — ANI (@ANI) October 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बाबर आझमचं अर्धशतक : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान ४२.५ षटकात सर्वबाद केवळ १९१ धावाचं करू शकला. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफिकनं अनुक्रमे ३६ आणि २० धावांचं योगदान दिलं. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार बाबर आझमनं सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. त्यानं ५८ चेंडूत शानदार ५० धावा ठोकल्या. मात्र तो बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव गडगडला.

भारताची गोलंदाजी : त्यानंतर मोहम्मद रिझवाननं एका टोकावरून किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला ४९ धावांवर बुमराहनं बोल्ड केलं. त्यानंतर पाकिस्तानचा एकही फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. या सामन्यात भारताच्या सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. बुमराहनं ७ षटकांत १९ धावा देत २ बळी घेतले. याशिवाय सिराज, हार्दिक, कुलदीप आणि जडेजानं २-२ विकेट घेतल्या.

रोहित शर्माचं रौद्र रूप : पाकिस्ताननं दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात डळमळीत झाली. सलामीवीर शुभमन गिल स्वस्तात परतला. त्याला शाहीन आफ्रिदीनं १६ धावांवर तंबूत परत पाठवलं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहलीही खेळपट्टीवर जास्त वेळ टिकला नाही. त्याला १६ च्या स्कोरवर हसन अलीनं बाद केलं. दुसऱ्या टोकावर मात्र कर्णधार रोहित शर्माचं रौद्र रूप पाहायला मिळालं. त्यानं चौकार-षटकारांची बरसात करत पाकिस्तानी गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढलं. रोहितनं ६३ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीनं ८६ धावा केल्या.

जसप्रीत बुमराह सामनावीर : चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरनं रोहितला चांगली साथ दिली. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. अय्यरनं ६२ चेंडूत ५३ धावा करत विश्वचषकातील आपलं पहिलं अर्धशतक नोंदवलं. दुसऱ्या टोकावर केएल राहुल १९ धावा करून नाबाद राहिला. ७ षटकांत २.७ च्या इकॉनॉमी रेटनं केवळ १९ धावा देत २ विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

  • #WATCH | ICC World Cup | Jasprit Bumrah gets 'Player of the match' award as India registers a 7-wicket win over Pakistan in Ahmedabad, Gujarat.

    (Pic Source: ANI Photo) pic.twitter.com/6tvQI574qd

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : हार्दिक पांड्याची मॅजिक ट्रिक अन् विराट कोहलीनं घातली चुकीची जर्सी!

Last Updated : Oct 14, 2023, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.