ETV Bharat / sports

Ajay Ratra Interview : पंड्याला दुखापत झाल्यानं रोहित-विराटनं एकत्र विश्वचषकात सहाव्या गोलंदाजाची भूमिका निभवावी : अजय रात्रा - भारतीय संघ

Ajay Ratra Interview सध्याच्या क्रिकेट विश्वचषकात भारताची विजयी रथयात्रा सुरूच आहे. कारण रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ या प्रतिष्ठित स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलाय. प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकण्याचा दावेदार असलेला भारत गुणतालिकेत 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. लखनौमध्ये गतविजेत्या इंग्लंडशी झालेल्या लढतीच्या एक दिवस आधी भारताचे माजी यष्टिरक्षक अजय रात्रा यांनी ईटीव्ही भारतच्या नवनीत तापडिया सोबत भारतीय संघाच्या संबंधित विविध पैलूंवर खास बातचीत केली.

ETV Bharat Exclusive
ETV Bharat Exclusive
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 10:12 AM IST

हैदराबाद Ajay Ratra Interview : भारतात सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघ चमकदार कामगिरी करत आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेल्या भारतानं ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. आज लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर भारतीय संघाचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होईल. दुखापतग्रस्त अष्टपैलू हार्दिक पंड्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. कारण तो दुखापतीतून सावरला नसल्यानं तो इंग्लंडविरुद्ध खेळण्याची शक्यता नाही. हे पाहता, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी नेटमध्ये गोलंदाजी करणारा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली हे हार्दिकच्या जागी सहाव्या गोलंदाजाची भूमिका बजावू शकतात, असं भारताचे माजी यष्टिरक्षक अजय रात्रा यांना वाटते. या विश्वचषकात हार्दिक पांड्यानं 5 विकेट्स घेतल्या असून 11 धावा केल्या आहेत.

काय म्हणाले अजय रात्रा : भारतासाठी 6 कसोटी आणि 12 एकदिवसीय सामने खेळलेले 41 वर्षीय अजय रात्रा ईटीव्ही भारतशी एका खास संवादात म्हणाले, 'या संघाची खास गोष्ट म्हणजे जेव्हा खेळाडूंना संधी मिळाली, तेव्हा त्यांनी चांगली कामगिरी केलीय. संघाची एकूण कामगिरी सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट राहिली आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे भारतीय संघानं स्पर्धेत वर्चस्व राखलंय. पुढं बोलताना अजय रात्रा म्हणाले, 'न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याची अनुपस्थिती जाणवली नाही. गेल्या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीनं शानदार गोलंदाजी केली. बाकीचे खेळाडूही चमकदार कामगिरी करत आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांनी जबाबदार भूमिका साकारल्या आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यांनी आपली भूमिका चोख बजावली आहे.

टीम इंडियासाठी मोठा धक्का : जर हार्दिक पांड्या उर्वरित सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकला नाही तर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असेल. कारण त्याचा परिणाम संतुलनावर होईल. हार्दिक पांड्या हा सहावा गोलंदाज म्हणून भूमिका पार पाडत आहे. तो फिनिशरची भूमिकाही बजावतो. त्याच्या अनुपस्थितीत संघाला पाच गोलंदाजांवर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं काही प्रमाणात गोलंदाजी करावी, असं मत अजय रात्रा यांनी व्यक्त केलंय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळणारे रात्रा म्हणाले, 'काही वर्षांपूर्वी युवराज सिंग, सुरेश रैना, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर अर्धवेळ गोलंदाजाच्या भूमिकेत असायचे. यामुळंच संघाला विशेष सहाव्या गोलंदाजाची कमतरता भासली नाही. आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीला त्यांच्या गोलंदाजीचा सराव करण्यासाठी वेळ मिळालाय. त्यांनी त्यानुसार काम करायला हवे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवामुळं इंग्लंडच्या मनोबलावर परिणाम : इंग्लंड पाच सामन्यांत केवळ एक विजय मिळवून गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. मात्र, जॉस बटलरला हलके घेऊ नका, असा इशारा रात्रा यांनी भारतीय संघाला दिला. रात्रा म्हणाले, 'इंग्लंड जखमी वाघासारखा झपाटून टाकू शकतो. सामन्याच्या दिवशी चांगली कामगिरी करणारा संघ विजयी होतो. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे इंग्लंडच्या मनोबलावर परिणाम झाल्याचेही रात्रा यांनी सांगितलं.

कर्णधार रोहितची उत्कृष्ट कामगिरी : रात्रा यांनी रोहित शर्माच्या नेतृत्व क्षमतेबद्दलही सांगितलं. रात्रा म्हणाले, 'रोहितला (शर्मा) इंडियन प्रीमियर लीगचा कर्णधार म्हणून खूप अनुभव आहे. आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करणे सोपे नाही. कारण स्पर्धेत अनेक परदेशी खेळाडू आहेत. सर्व खेळाडूंना सोबत घ्यावे लागते. रोहित शर्माला याचा खूप चांगला अनुभव आला आहे. 99 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4029 धावा करणारे रात्रा पुढं म्हणाले, 'त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात रोहित शर्मा कर्णधार म्हणून चांगले निर्णय घेत आहे. त्याच्या खेळाडूंचा जास्तीत जास्त वापर करत आहे. तसंच, तो आक्रमक फलंदाजी करत आहे. त्यामुळं इतर खेळाडूंवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. एकूण कामगिरी उत्कृष्ट होते.

1983 चा विश्वचषकाचा क्षण अविस्मरणीय : दरम्यान, रात्रा म्हणाले की, कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 1983 चा विश्वचषक जिंकणं हा त्यांच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. रात्रा म्हणाले, '2011 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता. पण माझ्यासाठी लॉर्ड्सवर विश्वचषक ट्रॉफीसह कपिल देव यांची प्रतिमा कायम माझ्या हृदयात राहील. कारण मी तेव्हा लहान होतो.'

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 AUS vs NZ : 32 षटकार, 65 चौकार, 771 धावा; ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामन्यात मोडण्यात आले 'हे' विक्रम
  2. Babar Azam Security : कोलकात्यात बाबर आझमसाठी अभूतपूर्व सुरक्षा! ईडन गार्डन्सवरही तैनात असतील पोलीस
  3. Allu Arjun wish for David Warner : अल्लु अर्जुननं डेव्हिड वॉर्नरला दिल्या 'पुष्पा' स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.